लखनऊ, 9 ऑगस्ट : सुमारे 15 वर्षांपूर्वी (15 years ago) हिंदू (Hindu) धर्मातून मुस्लीम (Muslim) धर्मात प्रवेश कऱणाऱ्या नात्यातल्या तीन कुटुंबांनी (three families) पुन्हा हिंदू धर्म स्विकारला आहे. उत्तर प्रदेशातील कांधला गावातील महाभारतकालीन मंदिरात जाऊन त्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला. धर्मांतर ते धर्मवापसी एकाच परिवारातील एकूण 18 जणांनी सोमवारी हिंदू धर्मात प्रवेश केला. कांधला गावातील या कुटुंबाने 15 वर्षांपूर्वी हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्मात प्रवेश केला होता. गेली 15 वर्षं ते मुस्लीम धर्माचा अनुनय करत होते आणि मुस्लीम पद्धतीने ईश्वराची भक्ती करत होते. आता त्यांनी मुस्लीम धर्म सोडून पुन्हा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कांधल्यातील प्रसिद्ध सूरज कुंड मंदिरात या कुटुंबीयांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. मूळचे उत्तर प्रदेशच्या रायजादगानमधले रहिवासी असणारे शहजाद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्मात परत येण्याचा निर्णय घेतला. शहजाद यांचे कुटुंबीय एकत्र असले तरी ती एकूण तीन कुटुंबे आहेत. या तीनही कुटुंबांतील 18 सदस्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. सूरज कुंड मंदिराच्या आवारात होमहवन करण्यात आलं. धार्मिक विधींनुसार या 18 जणांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांना जानवं परिधान करायला लावून शहजाद हे नाव बदलण्यात आलं. आता पूर्वीचा शहजाद विकास झाला आहे. 15 वर्षांपूर्वीदेखील त्याचं नाव विकास होतं. ते बदलून शहजाद करण्यात आलं होतं. आता पुन्हा त्याचं नाव विकास झाल्याची माहिती आहे. हे वाचा - 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी विकासचे दोन भाऊ आणि त्याच्या आईनंही हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. विकासच्या वडिलांनी मात्र मुस्लीम धर्मातच राहणं पसंत केलं आहे. मात्र लवकरच त्यांचंही मनपरिवर्तन करून त्यांना हिंदू धर्मात आणू, असा विश्वास विकासच्या आईने व्यक्त केला आहे. तर अनेक नागरिक चुकीचा निर्णय़ घेऊन हिंदू धर्म सोडतात, मात्र त्यांना उपरती होऊन पुन्हा ते हिंदू धर्मात परत आल्यामुळे त्यांचं स्वागत करत असल्याचं हा विधी करणाऱ्या पुरोहितांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.