जाहिरात
मराठी बातम्या / देश / राहुल गांधींनी बदलली स्टाईल, दाढी आणि सुटमध्ये दिसला कुल लूक!

राहुल गांधींनी बदलली स्टाईल, दाढी आणि सुटमध्ये दिसला कुल लूक!

राहुल गांधींनी बदलली स्टाईल, दाढी आणि सुटमध्ये दिसला कुल लूक!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला लुक बदलला आहे. ब्रिटनमध्ये ते संपूर्ण नव्या स्टाईलमध्ये दिसले.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 1 मार्च :   काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा पूर्ण केली आहे. चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी सुमारे तीन हजार 500 किलोमीटर अंतर पायी चालून पार केलं. संपूर्ण भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल हे वाढलेली दाढी आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, अशा लूकमध्ये दिसले. यात्रा पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपल्या दाढीचे केस कापले नाहीत. आता मात्र, राहुल यांनी आपला लूक बदलला आहे. त्यांच्या नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ब्रिटन दौऱ्यावर राहुल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आठवडाभरासाठी ब्रिटनला गेल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी (1 मार्च) सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो राहुल यांच्या ब्रिटनमधील चाहत्यांनी काढलेले दिसत आहेत. ज्यामध्ये ते सूट-बूट घालून एकदम नवीन लूकमध्ये ते दिसत आहेत. ‘हजला जाण्यासाठी जल वाहतूक पुन्हा सुरू करा’; मुंबईतील चौघांचं पंतप्रधानांना पत्र, केंद्रानं म्हटलं…

     क्लीन शेव्ह नाही

    ब्रिटनमधील जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी भाषण करणार आहेत. तिथे ते भारतीय प्रवासी समुदायाशीही संवाद साधणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपली वाढलेली दाढी काढून टाकली आहे. पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी क्लीन शेव्ह केलेली नाही. त्यांनी दाढी फक्त ट्रीम केली आहे. महागाईचा आगडोंब; सर्वसामान्यांनी सांगा जगायचं कसं? वाचा काय झालंय महाग यांचा न्हावी नक्की बनारसी असणार… राहुल गांधींचे ब्रिटनमधील फोटो सोशल मीडियावर येताच युजर्सनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. अशोक नावाच्या युजरनं लिहिलं आहे की, ‘राहुल गांधी केंब्रिजमध्ये आहेत. त्यांना नक्कीच कोणीतरी बनारसी न्हावी सापडला आहे. त्याने एकदम व्यवस्थित दाढी-मिशी सेट करून दिली आहे. हे बघून मोदींचा आत्मविश्वास नक्कीच डळमळीत होईल.’ ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये राहुल गांधी मोहक हसताना दिसत आहेत. दाढी एकदम कमी केल्यामुळे राहुल यांच्या गालावर पडणारी खळी पुन्हा दिसू लागली आहे. ही बाब अनेक युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. सप्टेंबर महिन्याच्या (2022) पहिल्या आठवड्यापासून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. यात्रा संपेपर्यंत राहुल गांधींनी दाढी वाढवली होती. अनेक विरोधी नेत्यांनी त्यांच्या दाढीची खिल्लीही उडवली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात