Home /News /national /

दिल्लीत जाताच नाना पटोले गार, स्वबळाचा नारा निघाला फुसका बार

दिल्लीत जाताच नाना पटोले गार, स्वबळाचा नारा निघाला फुसका बार

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत होतं.

नवी दिल्ली, 25 जून: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) राज्यात सत्ता आहे. मात्र, असे असतानाच काँग्रेस (Congress) पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर सुद्धा केलं आहे. मात्र, आता नाना पटोलेंचा (Nana Patole) स्वबळाचा हा नारा फुसका बार निघाल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आज दिल्लीत (Delhi) बोलावले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील (H. K. Patil), काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि नााना पटोले यांच्यात दिल्लीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत स्वबळाचा नारा, आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका, विधानसभा अध्यक्षांची निवड या बाबींवर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. Delta Plus मुळे ठाणे जिल्ह्यात कठोर निर्बंध; वाचा काय सुरू काय बंद ही बैठक जवळपास पावणे दोन तास सुरू होती. बैठकीनंतर एच के पाटील यांनी म्हटलं, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा प्री मॅच्युअर आहे. आत्ता तो विषय नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले हे दिल्लीत गारद पडले आणि त्यांचा स्वबळाचा नारा हा फुसका बार ठरला असल्याचं बोललं जात आहे. बैठकीनंतर नाना पटोले काय म्हणाले? नाना पटोले यांनी म्हटलं, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बाबत चर्चा झाली. पक्षाची संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली. प्रदेश संघटनेत किती उपाध्यक्षपद असावीत, सरचिटणीस किती असावेत यावर सुद्धा चर्चा झाली. राहुल गांधींना मला भेटायचे आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात झाली पाहिजे. ईडीचा दूरुपयोग मोदी सरकार करत असल्याचं अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईतून दिसून येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Congress, Election, Nana Patole

पुढील बातम्या