Home /News /maharashtra /

Delta Plus मुळे ठाणे जिल्ह्यात कठोर निर्बंध; वाचा काय सुरू काय बंद

Delta Plus मुळे ठाणे जिल्ह्यात कठोर निर्बंध; वाचा काय सुरू काय बंद

Restrictions in Thane: ठाणे जिल्ह्याचा समावेश आता तिसऱ्या लेवलमध्ये झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ठाणे, 25 जून: कोरोनाच्या डेल्टा (Delta Variant of Corona) आणि डेल्टा प्लस  (Delta Plus Variant of Corona) या विषाणूमुळे राज्यात तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आता नव्या सूचनांबाबत आदेश जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार आता ठाणे जिल्ह्याचा समावेश हा दुसऱ्या स्थरातून तिसऱ्या स्थरात झाला आहे. परिणामी ठाणे जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील (Thane District) ठाणे महापालिका (TMC) आणि नवी मुंबई या महापालिका (NMMC) दुसऱ्या लेव्हलमध्ये मोडत असताना आता या महापालिकांसोबत इतरही सर्व महापालिका तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगरपंचायत व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे शहर तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या बघता लेव्हल 3 मध्ये असणारे परिक्षेत्रामध्ये खालील प्रमाणे नियमावली लागू करण्यात आलेली आहे. पाहा ठाण्यात काय सुरू काय बंद? सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं. 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, सायंकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील. Anil Deshmukh: ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील. क्रिडा- सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत / सायंकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील. चित्रीकरण च्या आतमध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल व सायंकाळी 5 नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही. सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायंकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील. जमावबंदी सायंकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी सायंकाळी 5 वाजल्यानंतर लागू राहील. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स सायं. 4 पर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. मालवाहतूक जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर 5 मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ 50% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. उत्पादनाच्या अनुषंगाने : अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Thane

पुढील बातम्या