नवी दिल्ली,5मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यासंदर्भात ट्विट करताना दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख ‘पुलवामा दुर्घटना’ असा करून नवीन वाद निर्माण केला आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘आम्हाला आमच्या जवानांचा, त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर विश्वासदेखील आहे. सैन्यामध्ये माझ्या अनेक ओळखीचे आणि जवळचे नातेवाईक कार्यरत आहेत. ज्यांना कुटुंबीयांपासून दूर राहून देशवासीयांचे संरक्षण करताना मी पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईवर काही परदेशी माध्यमांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Congress leader Digvijaya Singh terms #Pulwama terrorist attack an “accident” . pic.twitter.com/AyAjwV8lm8
— ANI (@ANI) March 5, 2019
हमें हमारी सेना पर उनकी बहादुरी पर गर्व है व सम्पूर्ण विश्वास है। सेना में मैंने मेरे अनेकों परिचित व निकट के रिश्तेदारों को देखा है किस प्रकार वे अपने परिवारों को छोड़ कर हमारी सुरक्षा करते हैं। हम उनका सम्मान करते हैं।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike" के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. दिग्विजय सिंह यांच्यावर नेटिझन्सची कडाडून टीका
पुलवामा दुर्घटना या आतंकवादी घटना बोलने में शर्म आती हैं? ज़रा कपिल सिब्बल को समझाइये??
— राजेश कुमार सिंह 🇮🇳 (@raajeshksingh) March 5, 2019