जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / या घटनेनं तुमच्याही हृदयाला पडेल पिळ, रखरखत्या उन्हात उभं राहून केली ट्रेनची प्रतिक्षा, अखेर...

या घटनेनं तुमच्याही हृदयाला पडेल पिळ, रखरखत्या उन्हात उभं राहून केली ट्रेनची प्रतिक्षा, अखेर...

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाचं संकट… त्यात लॉकडाऊनमुळे लाखों परप्रांतीय मजूर मुंबईसह उपनगरात अडकले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मे: कोरोनाचं संकट… त्यात लॉकडाऊनमुळे लाखों परप्रांतीय मजूर मुंबईसह उपनगरात अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी जायचं आहे. अशातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या गावी जाण्यासाठी एक महिला ट्रेनची वाट पाहात उन्हात कित्तेक तास उभी होती. मात्र, ट्रेन आलीच नाही. कडाक्याच्या उन्हामुळे महिलेची अचानक तब्बेत बिघडली. महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत महिलेची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हेही वाचा…  भयानक! 3 वर्षांच्या लेकीला कंबरेला बांधून आईनं पुलावरून घेतली नदीत उडी वसई (पश्चिम) मधील सनसिटी ग्राउंडवर ही घटना घडली. नालासोपारा येथे रहिवाशी विद्योत्तमा शुक्ला (वय-57) यांनी आपल्या घरी जायचं होतं. विद्योत्तमा या ट्रेनची वाट पाहात कित्तेक तास उन्हात बसून होत्या. विद्येत्तोमा यांना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. यासाठी त्या सनसिटी ग्राउंडवर पोहोचल्या. तिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

News18

सकाळीची दुपार झाली तरी ट्रेनची काही आत्ता पत्ता नव्हता. दुपारी 2 वाजेच्या सुमारात विद्येत्तमा यांना अचानक भोवळ आली. त्या जमिनिवर पडल्या. पोलिस आणि काही लोकांनी त्यांना बेशुद्धअवस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मानिकपूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुसरीकडे, श्रमिक स्पेशल एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती झाली. महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सिकंदराबादहून ओडिशा जाणाऱ्या स्पेशल एक्स्प्रेसने ही महिला प्रवास करत होती. नंतर महिलेला बलांगीर येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळ आणि बाळंतीन सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा… लॉकडाऊन संपल्यानंतर काय असेल सरकारचा प्लॅन? महाविकास आघाडीच्या मंत्र्याची बैठक राजधानी कोरोनाच्या विळख्यात… देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32,791 झाली आहे. मुंबईत काल (मंगळवारी) कोविड-19 चे 1002 नवे रुग्ण सापडले. तर गेल्या 24 तासांत मुंबईत 39 जणांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आतापर्यंत 54758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा 1792 वर पोहोचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात