मुंबई, 30 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 7 विकेट्सनं पराभव करत 'प्ले ऑफ' च्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं आहे. या मॅचमध्ये (RCB vs RR) आरसीबीच्या बॉलर्सनी शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये राजस्थानला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं. बंगळुरुच्या बॉलर्सनी केलेल्या अचूक माऱ्याला त्यांच्या फिल्डर्सनीही चांगली साथ दिली. बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यामध्ये सर्वात आघाडीवर होता.
राजस्थानच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये विराटनं अफलातून फिल्डिंग केली. मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) टाकलेल्या त्या ओव्हरमध्ये ख्रिस मॉरीस (Chris Morris) ऑफ साईडला जोरदार फटका लगावला होता. तो बॉल बाऊंड्री लाईन पार करणार असं वाटत असतानाच विराट कोहली बंदुकीतील गोळीच्या वेगानं बॉलच्या दिशेनं झेपावला.
विराटनं हवेत झेपावत डोळ्याची पापणी लवण्यापूर्वी विराटनं तो बॉल अडवला आणि विकेट किपरकडं थ्रो केला. विराटनं केलेल्या या जबरदस्त फिल्डिंगवर ख्रिस मॉरीसचाही क्षणभर यावर विश्वास बसला नाही. फोर अडवल्याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
#MORRIS ne shot maara Goli ki Raftaar se!! Magar Raste me aagye Goli se tez KOHLI❤️👑 #RCBvRR #ViratKohli pic.twitter.com/5Rx3A9dDGL
— Swapnil Singh (@Swapnil_Singh7) September 29, 2021
राजस्थानने ठेवलेल्या 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग बंगळुरूनं 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 30 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. तर श्रीकर भरत (S Bharat) 35 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांच्या ओपनिंग जोडीने बँगलोरला 48 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. विराट 25 रनवर आणि पडिक्कल 22 रनवर माघारी परतले. राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानला 2 विकेट मिळाल्या.
IPL 2021, RCB vs RR: OUT करणाऱ्या खेळाडूला दिलं विराटनं स्पेशल गिफ्ट, पाहा Photos
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले राजस्थानला बॅटिंगला बोलावलं. यानंतर एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) ओपनिंग जोडीने राजस्थानला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघांनी 8.2 ओव्हरमध्येच 77 रन केले, पण त्यानंतर राजस्थानची बॅटिंग गडगडली. लुईस 37 बॉलमध्ये 58 रन करून आऊट झाला, तर यशस्वी जयस्वालला 22 बॉलमध्ये 21 रन करता आले. बंगळुरुकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Video viral, Virat kohli