Lockdown मध्ये रुग्णालयाने डॉक्टरला काढून टाकलं, निषेधार्थ सुरू केला चहाचा गाडा

Lockdown मध्ये रुग्णालयाने डॉक्टरला काढून टाकलं, निषेधार्थ सुरू केला चहाचा गाडा

नोकरीवरून काढून टाकल्यानंतर डॉक्टरने चहाचा गाडा लावून कंपनीविरोधात निषेध नोंदवला आहे.

  • Share this:

कर्नाल, 17 मे : लॉकडाऊनमध्ये नोकरीवरून काढून टाकल्यानं एका डॉक्टरने सेक्टर 13 मध्ये अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. डॉक्टरने चहाचा गाडा सुरू केला. डॉक्टरच्या ड्रेसमध्ये डॉक्टर गौरव शर्मा त्यांच्या पत्नीसह रस्त्यावर दोन दिवसांपासून चहाचा गाडा लावत आहेत. डॉक्टर गौरव यांनी कंपनीची तक्रार सीएम विंडोवर केली आहे. प्रशासनाकडून अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही.

भिवानीतील डॉक्टर गौरव यांनी सांगितलं की, रुग्णालयात एका कंपनीच्या माध्यमातून काम मिळालं होतं. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन दिलं जात नव्हतं. त्यासोबत चार महिन्यांचा ओव्हरटाइमसुद्धा दिला नाही. डिसेंबर महिन्यात लग्न झालं असून घरखर्च भागवणं कठीण झालं आहे.

कोरोनाच्या लढ्यात एका बाजुला डॉक्टर्सना कोरोना योद्धा मानलं जात आहे. तर दुसरीकडे डॉक्टरलाच नोकरीतून काढल्याचं दिसत आहे. डॉक्टरने म्हटलं आहे की, जोपर्यंत पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत चहाचा गाडा लावून विरोध करत राहीन.

हे वाचा : प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय

गौरव शर्मा ज्या कंपनीत काम करत होते त्याचे युनिट हेड राकेश यांनी सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये वेतन देण्यात अडचणी येत आहेत. गौरव यांनी जे आरोप केलेत ते बरोबर नाहीत. त्यांनी अनेकदा बेकायदेशीर वर्तणूक केली आहे. यासाठी तीन चार वेळा नोटीसही पाठवली होती. कंपनीचे अधिकाऱी त्यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा भेटण्यास नकार दिला होता.

हे वाचा : Lockdown मुळे बायको माहेरीच अकडली, पतीने मुलांसमोर मावस बहिणीशी थाटला विवाह

First published: May 17, 2020, 6:05 PM IST

ताज्या बातम्या