जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय

प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय

प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय

बॉलीवूडचा हा अभिनेता प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला असून त्यानं मजूरांना घरी पोहचवण्याची सोय केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : सध्या कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग लढत आहे. देशातही या व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण त्यामुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या मजूरांनी दोन वेळचं खाणं आणि राहण्यासाठी घर याचा चिंतेनं आपल्या घराचा रस्ता पायी कापयला सुरुवात केली आहे. त्यांचा हा प्रवास सोपा व्हावा यासाठी सरकराचे प्रयत्न तर सुरू आहेतच पण यासोबतच काही सेलिब्रेटी सुद्धा या मजूरांच्या मदतीला धावून आले आहेत. अभिनेता सोनू सूदनं काही दिवसांपूर्वी कर्नाटकला जाणाऱ्या मजूरांसाठी बसची सोय केली होती. त्यानंतर आता त्यानं आणखी 3 राज्यातील मजूरांच्या घरी पोहचवण्याची सोय केली आहे. फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. त्यांनी सोनू सूद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो मजूरांना बसमध्ये बसवून घरी पाठवताना आणि त्यांचा निरोप घेताना दिसत आहे. कर्नाटकच्या प्रवासी मजूरांनंतर सोनूनं उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली आहे.

जाहिरात

उत्तर प्रदेश सरकारनं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपल्या राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. यावर सोनू सूदनं आपल्या मित्राची मदतीनं सरकारकडून परवानगी घेतली आहे. ज्यानंतर मुंबईच्या वाडाळा येथून उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार सारख्या राज्यांच्या वेगवेगळ्या भागात सोनूनं जवळापास 12 बस पाठवल्या आहेत. या दरम्यान त्यानं सरकारनं सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. सोनूनं काही दिवसांपूर्वी प्रवासी मजूरांच्या मदतीचं वचन दिलं होतं. तो म्हणाला, प्रवासी मजूर आपल्या देशाचं हृदय आहेत. माझं कर्तव्य आहे की मी त्यांची मदत करू. आपण आता एसीमध्ये बसून फक्त ट्वीट करू शकत नाही. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना घरी पोहोचवण्याचं काम करत आहे. या कामातून मला आनंद मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात