आश्चर्यकारक! Lockdown मुळे बायको माहेरीच अकडली, पतीने मुलांसमोर मावस बहिणीशी थाटला विवाह

आश्चर्यकारक! Lockdown मुळे बायको माहेरीच अकडली, पतीने मुलांसमोर मावस बहिणीशी थाटला विवाह

लॉकडाऊनमुळे पत्नी माहेरी दुसऱ्या शहरात अडकली. त्यामुळे तिच्या नवऱ्याने नात्यातल्याच एका तरुणीशी लग्न उरकून घेतलं.

  • Share this:

बरेली, 17 मे : कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं गेलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकली आहेत. पण यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे. पत्नी लॉकडाऊनमुळे माहेरी अकडल्यामुळे पतीने चक्क दुसरा विवाह केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनमुळे पत्नी माहेरी दुसऱ्या शहरात अडकली. त्यामुळे तिच्या नवऱ्याने नात्यातल्याच एका तरुणीशी लग्न उरकून घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने त्याच्या मावस बहिणीशी विवाह केला. जेव्हा हे पत्नीला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर तिने 'मेरा हक फाउंडेशन' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष फरहत नकवी यांना मदतीची विनंती केली आहे.

फरहत नकवी म्हणाल्या की, पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून त्या या प्रकरणी एसएसपीकडे तक्रार करतील. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण आणि मेरा हक फाउंडेशनच्या अध्यक्ष फरहत नकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीमचे लग्न 2013मध्ये नगरिया तालाब इथल्या रहिवासी नईम मन्सुरीशी झालं होतं. नसीमला तीन मुलं आहेत.

गरीब विक्रेत्याकडून खरेदी केले सर्व चपलांचे जोड; अनवाणी चालणाऱ्या मजुरांना दिले

19 मार्च 2020 रोजी नईमने नसीमला तिच्या माहेरी सोडलं होतं. 22 मार्च रोजी कर्फ्यू आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांची पत्नी माहेरीच अडकली. पण यादरम्यान, नईम मन्सुरीनं मावशीच्या मुलीशी दुसरं लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे नसीमच्या चार वर्षाच्या मुलानं आपल्या आईला फोनवरून वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती दिली.

पायी निघालेल्या कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार, रक्ताच्या उलट्या झाल्या अन्...

नात्याने बहिण लागणाऱ्या तरुणीशी विवाह

पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा ती महिला तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या एका नातेवाईकाच्या बहिणीशी लग्न केल्याचं समजलं. ते दोघे एकत्र राहत होते. जेव्हा महिलेने याचा विरोध केला तेव्हा तिचा नवरा दोन्ही बायका एकत्र ठेवण्याविषयी बोलू लागला, परंतु नसीम यासाठी तयार नव्हती आणि आता तिला पतीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा आहे.

यामुळेच पीडित नसीमने मेरा हक फाउंडेशनचे अध्यक्ष फरहत नकवी यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. फरहत नकवी म्हणाल्या की ती याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून पीडितेला न्याय देईल. त्यामुळे पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शेतात काम आटोपून घरी जेवायला निघाले, समोरासमोर दुचाकीच्या धडकेत 2 तरुण ठार

First published: May 17, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या