नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: देशाची राजधानी दिल्लीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणीला तिच्या घरच्यांनी वाढदिवसाची भेट म्हणून मोठ्या प्रेमाने दुचाकी भेट दिली आहे. पण हजारो रुपये खर्चून घेतलेली ही दुचाकी तरुणीसाठी डोकेदुखी ठरली आहे. गाडीच्या नंबरप्लेटमुळे तिला घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. गाडीचा नंबरप्लेट तिच्यासाठी लज्जास्पद बाब बनली आहे. त्यामुळे तिला संबंधित दुचाकीवर कॉलेजलाही जाता येत नाहीये. गाडीच्या नंबरप्लेटमुळे संबंधित तरुणीसोबत तिचं कुटुंबही हताश झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कुटीधारक तरुणीचा गेल्या महिन्यात वाढदिवस होता. त्यामुळे तिने आपल्या आई वडिलांकडे स्कुटीसाठी हट्ट केला होता. लेकीचा लाड पुरवण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबानं देखील बचतीतून हजारो रुपयांची स्कुटी खरेदी केली आहे. स्कुटी घेतल्यामुळे लेकीचा कॉलेजला जाण्याचा त्रास वाचेल, यातून कुटुंबीय देखील खूश होते. हेही वाचा-
बर्थडेला नेलं अन् पत्नीला केलं मित्रांच्या हवाली, गँगरेपच्या घटनेनं हादरली मुंबई पण आरटीओकडून गाडीला मिळालेल्या नंबरप्लेटमुळे संबंधित तरुणीला कॉलेजलाच नव्हे तर घराबाहेर जाणंही मुश्कील झालं आहे. आरटीओकडून दुचाकीला मिळालेल्या नंबरमध्ये SEX अशी अक्षरं मिळाली आहेत. त्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबीयाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. संबंधित तरुणीच्या भावांनी सांगितलं की, गाडीचा नंबरप्लेट पाहून आसपासची लोकं विचित्र नजरेनं पाहायला लागतात.
(फोटो- आज तक)
हेही वाचा- Bhiwandi: मॅरेज ग्राउंडमध्ये भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव, पाहा VIDEO याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर, त्यांनी गाडीचा नंबरप्लेट बदलून देण्याबाबत दिल्लीतील आरटीओ ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी बातचित केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीतील जवळपास दहा हजार गाड्यांना SEX या सिरीजचा नंबर मिळाला आहे. दिल्ली वाहतूक आयुक्तांनी सांगितलं की, ‘गाडीला एकदा नंबर मिळाला की, परत तो बदलून देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. कारण सर्व प्रक्रिया या पॅटर्ननुसार चालते.’ गाडीच्या नंबरप्लेटमुळे संबंधित तरुणीला आणि तिच्या कुटुबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.