मुंबई, 28 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर, उद्योगांवर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अॅवॉर्ड्स 2020 या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रमुख उपस्थिती होती. CNBC च्या मॅनेजिंग एडिटर शिरीन भान यांनी त्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती. या वर्षीचा सर्वोत्तम राज्याचा ’ स्टेट ऑफ द इयर’ पुरस्कार महाराष्ट्र राज्याला देण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास, HDFC बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. दीपक पारेख यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उद्योजकांशी संवाद उद्योगांनी पुढे येऊन सरकारला त्यांच्या अडचणी, त्यांच्या सूचना सांगाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणंही तेच आहे. सरकारने एकतर्फी अर्थव्यवस्थेसंदर्भात निर्णय घेण्याऐवजी उद्योगांनी एकत्रितपणे सरकारशी चर्चा करावी, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर हा 4.7% वर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. G20 च्या बैठकीच्या वेळी जगभरातल्या उद्योजकांनी आणि गुंतवणूकदारांनी भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली, अनेकांना भारतात गुंतवणुक करायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
(हेही वाचा : दिल्लीच्या हिंसाचारावर RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान)
गुंतवणूक, रोजगारासाठी प्रयत्न भारतातली गुंतवणूक वाढावी आणि रोजगार वाढावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महिलांना ग्रामीण भागात शेतमालाच्या मार्केटिंगसाठी आणि साठवणुकीसाठी केंद्र सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. आम्ही शेतीकडे दुर्लक्ष करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. =====================================================================================