• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • क्यू आर कोड तपासण्यासाठी राज्य सरकारनं यंत्रणा उभी करावी, रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला दणका

क्यू आर कोड तपासण्यासाठी राज्य सरकारनं यंत्रणा उभी करावी, रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला दणका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी येत्या 15 ऑगस्टपासून (15th August) रेल्वे (Mumbai Local Train) सुरु करणार असल्याची घोषणा काल केली. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी येत्या 15 ऑगस्टपासून (15th August) रेल्वे (Mumbai Local Train) सुरु करणार असल्याची घोषणा काल केली. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र मुंबईमध्ये लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण लसी (Corona Vaccine) संदर्भात सर्व डाटा राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान रावसाहेब यांनी राज्य सरकारला हे वक्तव्य करुन चांगलाच झटका दिला आहे. लोकल प्रवासासाठी आवश्यक असणारा क्यू आर कोड (QR Code) पास तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारनेच घ्यावी, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. हे वक्तव्य करुन दानवेंनी राज्य सरकारला एक प्रकारचा दणका दिला आहे. तसंच हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचंही ते म्हणालेत. प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती असं मतही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारनं यंत्रणा उभी करावी- दानवे रेल्वेच्या प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा क्यूआर कोड स्मार्टफोनवर मिळणार आहे. मात्र हा क्युआर कोड तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. त्यासाठी राज्य सरकराने यंत्रणा उभी करावी, असं म्हणत मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणालेत. पुण्यात मराठा आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक, हा असेल बैठकीचा अजेंडा प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. कारण दोन डोस घेतलेल्यांचा डाटा राज्य सरकारकडेच आहे. त्यामुळे तशी सोय राज्यानं करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल, असंही ते पुढे बोलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं ज्या प्रमाणे निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची परिस्थितीही सद्याच्या घडीला आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. अनलॉक MH-12, जाणून घ्या आजच्या पुणे Unlock विषयी जनतेची सुविधा लक्षात घेतली पाहिजे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करु द्यायचा होता तर मग हा निर्णय फार आधी घ्यायला हवा होता, असंही ते म्हणाले. मात्र हा निर्णय जाहीर करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाशी थोडी चर्चा करायला हवी होती. जेणेकरुन लोकलच्या फेऱ्या कशा प्रकारे सुरू करायच्या, असा निर्णय घेतला असता तर ते प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीचं झालं असतं, असंही दानवेंनी म्हटलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: