मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? प्रश्न ऐकताच नितीश कुमार उठून चालू लागले, पुढे घडला 'राजकीय ड्रामा'

पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? प्रश्न ऐकताच नितीश कुमार उठून चालू लागले, पुढे घडला 'राजकीय ड्रामा'

पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितीश कुमार (Nitish Kumar) यासाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात का? यानंतर जे घडलं त्याचीच जास्त चर्चा रंगली आणि राजकीय अर्थ काढले जाऊ लागले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 01 सप्टेंबर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बुधवारी एक दिवसाच्या दौऱ्यावर बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचले होते. इथे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी बंद खोलीत दीर्घ संवाद साधला. राजकीय जाणकारांनी या बैठकीला 2024 साठीचे भाजपविरोधी एकजुटीचे संकेत मानलं आहे.

कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..' उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा

या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान केसीआर म्हणाले की, त्यांचे आणि नितीश कुमार यांचे ध्येय 'भाजपमुक्त भारत' बनवणे आहे. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की नितीश कुमार यासाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात का? यानंतर जे घडलं त्याचीच जास्त चर्चा रंगली आणि राजकीय अर्थ काढले जाऊ लागले.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विरोधी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल प्रश्न विचारला असता नितीश कुमार वेगळ्याच मूडमध्ये दिसले. या प्रश्नावर सीएम नितीश कुमार खुर्चीवरून उठले आणि हा प्रश्न विचारू नका, असं म्हणू लागले. मात्र, केसीआर बोलत राहिले आणि नितीश यांना बसण्यास सांगत राहिले. मात्र सीएम नितीश यांनी त्यांना उठून इथून चला, असं म्हणण्यास सुरुवात केली.

धनंजय मुंडेंचा शायरीतून CMवर पलटवार, मुंबईतही अवैध बांधकांवर कारवाई होणार? कोरोनावर नवा उपाय

केसीआर वारंवार म्हणत होते की नितीश जी, बसा. यावर नितीश कुमार म्हणाले, नाही, नाही आता चला. पत्रकार फालतू प्रश्न विचारत आहेत. त्यानंतर पुन्हा केसीआर यांना विचारण्यात आलं, की तिसरी आघाडी स्थापन होणार का आणि त्याचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल. त्यावर ते म्हणाले की, आम्ही एकत्र बसून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. तुम्ही लोक काळजी करू नका.

इतक्यात काँग्रेसबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या आघाडीत काँग्रेसही राहणार का, काँग्रेसची भूमिका काय असेल, असा प्रश्न केला गेला. राहुल गांधींची भूमिका काय असेल? यावर नितीश कुमार म्हणाले की, आमची 'मेन फ्रंट' आहे, तिसरी आघाडी काय असते.

First published:

Tags: Nitish kumar, Politics