भारतीय वाघांचे आता गिनीज बुकमध्ये नाव, व्याघ्रगणनेने रचला नवा रेकॉर्ड
भारताच्या 2018 मधील वाघांच्या जनगणनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे
|
1/ 8
भारताच्या 2018 मधील वाघांच्या जनगणनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. (फोटो सौजन्य- Twitter @PrakashJavadekar)
2/ 8
भारताचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. वाघांची देशभरातील संख्या सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचली आहे.
3/ 8
एकूण 139 स्टडी साइट्सवर 26,760 वेगवेगळ्या ठिकाणी पेअर्ड कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले होते. यामधून अंदाजे 35 दशलक्ष फोटो काढले आहेत.
4/ 8
35 दशलक्ष फोटोंमध्ये साधारण 76,523 फोटो हे वाघांचे तर 51,337 फोटो बिबट्यांचे आहेत.
5/ 8
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ट्विटरवर अशी माहिती दिली की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने #SankalpSeSiddhi च्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.'
6/ 8
आतापर्यंत केलेल्या वन्यजीवनाच्या सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या 6 टक्क्यांनी वाढून अंदाजे 3,000 प्राण्यांवर पोहोचली आहे.
7/ 8
भारतातील वार्षिक व्याघ्रगणनेनुसार यापैकी अर्ध्याहून जास्त वाघ हे मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये आहेत
8/ 8
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला हे पाहण्याकरता अर्ज पाठवण्यात आला होता की, जगात कुठेही एवढे मोठे वन्यजीव सर्वेक्षण केले गेले आहे का