सोनिया आणि राहुल गांधी यांच्यात खरंच आहे का दुरावा?

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यात खरंच आहे का दुरावा?

राहुल गांधी हे महत्त्वांच्या बैठकांनाही हजर राहत नसून पक्षाच्या दैनंदिनन कामातही त्यांनी लक्ष घातलेलं नाही त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांच्यात मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झालीय.

  • Share this:

अनिल राय, नवी दिल्ली 04 ऑक्टोंबर : महाराष्ट्र आणि हरियाना या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती बाहेर येतेय. संजय निरुपम यांच्या आरोपानंतर त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. दिल्लीतले नेते स्थानिक गोष्टींचा विचार न करता निर्णय घेतात असा आरोप निरुपम यांनी केला होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली असून काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यात दुरावा निर्माण झालाय याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झालीय. निरुपम यांनी अप्रत्यक्ष सोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्यांवर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकरांना फोन केला होता पण आमचं जमलं नाही - ओवेसी

राहुल गांधी यांनी राजीनामा देताना सोनिया गांधी यांना विश्वासात घेतलं नव्हतं. नंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून सोनियांनी राहुल गांधींना समजविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो निर्णय त्यांनी बदलला नाही. नंतर त्यांनी दबावही आणण्याचा प्रयत्न केला तोही त्यांनी झुगारून लावला होता. प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद सांभाळावं असं सोनियांना वाटत होतं मात्र राहुल गांधी यांनी तोही निर्णय होऊ दिला नाही त्यामुळं सोनिया गांधी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेस घराण्याच्या बाहेरच्याच माणसाकडे जबाबदारी दिली जावी असं राहुल गांधी यांनी वारंवार जाहीर केलं. त्यामुळे अखेर सोनिया गांधी यांनाच पुढे येवून काँग्रेसचं बुडतं जहाज सांभाळावं लागलं होतं.

वादग्रस्त श्रीपाद छिंदम यांना नगरमधून 'बसपा'ची उमेदवारी

राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सोनिया गांधींच्या जवळचे असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचं महत्त्व कमी केलं होतं. त्यांनी नवी टीम बांधण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी अध्यक्षपदावरून गेल्यानंतर पुन्हा एकदा जुन्या नेत्यांना महत्त्व प्राप्त झालंय. तर अनेक तरुण नेते पक्ष सोडून जाऊ लागले. महाराष्ट्रातून संजय निरुपम यांनी आरोप करत प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अल्पेश ठाकोर, प्रियंका चुर्वेदी, कृपाशंकर सिंह, उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. हे सर्व नेते राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याचं मानलं जातंय. हरियाणातले नेते अशोक तंवर यांनीही राजीनामा दिलाय.

राहुल गांधी हे महत्त्वांच्या बैठकांनाही हजर राहत नसून पक्षाच्या दैनंदिनन कामातही त्यांनी लक्ष घातलेलं नाही त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांच्यात मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झालीय.

First published: October 4, 2019, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading