सागर कुलकर्णी, मुंबई 04 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ आणि MIM वेगळं लढणार आहेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी प्रयत्न केला होता. आंबेडकरांना फोनही केला होता मात्र आमचं एकत्र येणं जमलं नाही असा खुलासा MIMचे प्रमुख असाद्दुन ओवेसी यांनी केलाय. वंचित सोबत मतभेद का झाले हे जलील यांनी सांगितलं आहे, ते मी पुन्हा सांगणार नाही असंही ते म्हणाले. मुंबईत ओवीसी यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांचा आपण सन्मान करतो पण आता आमचे मार्ग वेगळे झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. ओवेसी म्हणाले, रिमोट कंट्रोल आता चालत नाही म्हणूनच ठाकरे निवडणुकीत उतरले आहे ते निवडणूक लढवत आहे असा खोचक टोलाही असुद्दीन ओवीसी यांनी आदित्य ठाकरेंना लागवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून सर्वाधिक आमदार पक्ष सोडून गेले. त्यांना आपला पक्ष टिकविता आला नाही आणि ते आमच्यावर व्होट कटवा म्हणून टीका करतात अशी टीकाही ओवीसी यांनी केली.
वादग्रस्त श्रीपाद छिंदम यांना नगरमधून ‘बसपा’ची उमेदवारी
विरोधक मतविभाजनाचे प्रश्न मलाच का विचारले जातात असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि सेनेत गेले. ते सर्वांत जास्त विरोधकाची ताकद कमी करण्यास जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच विरोधक म्हणून प्रभावी ठरले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही भाजपची बी पार्टी नाही तर ए पार्टी आहोत असंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफी फसवी आहे, शेतकरी आत्महत्या करतात, बेरोजगारी यावर सरकार बोलू पाहत नाही. त्यांना फोकस वेगळा करायचा आहे अशी टाकाही त्यांनी केली.
कणकवलीत ‘युती’ तुटली, शिवसेनेने दिला नितेश राणेंविरुद्ध उमेदवार
ईडी प्रकरणात मी फार बोलणार नाही स्थानिक नेतेच त्यावर प्रतिक्रिया देतील. जास्त बोलून मी तुरुंगात जावं असं तुम्हाला वाटतं का असा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुस्तानातील मुस्लिमांना पाकिस्तानातल्या मुस्लिमांशी देणंघेणं नाही. वारंवार आम्हाला त्याबद्दल का विचारले जाते असा सवालही त्यांनी केला. आम्ही भारतीय मुस्लिम आहोत, आ्ही इथलेच आहेत हीच आमची भूमिका आहे असंही ते म्हणाले.