Home /News /aurangabad /

सख्खं नातंही विसरला नराधम; औरंगाबादेत अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार

सख्खं नातंही विसरला नराधम; औरंगाबादेत अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Minor Girl Rape in Aurangabad: औरंगाबाद येथील गोलवाडी परिसरात एका तरुणाने आपल्याच मावस बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    औरंगाबाद, 01 जानेवारी: औरंगाबाद (Aurangabad) येथील गोलवाडी परिसरात एका तरुणाने आपल्याच मावस बहिणीवर अत्याचार (Minor sister raped by brother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडितेसोबत वारंवार लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्याने पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर (Victim became pregnant) राहिली आहे. घाटी रुग्णालयात पीडितेची प्रसूती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी नराधम मावस भावाच्या मुसक्या आवळल्या (Accused brother arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी औरंगाबाद येथील गोलवाडी परिसरातील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा मावस भाऊ तिचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी भावानं पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याने ती सात महिन्यांची गरोदर राहिली होती. दरम्यान पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला 29 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हेही वाचा-पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत मोडलं लग्न याठिकाणी डॉक्टरांनी पीडित मुलीची तपासणी केली असता, ती सात महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचं ऐकून कुटुंबीयांना देखील धक्का बसला. सात महिन्यांची गरोदर असतानाच, पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली आहे. या प्रकरानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मावस भावानेच अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा-Mumbai: अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा, सापळा रचून 2 दलालांना अटक याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आरोपी मावस भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी बाळाचा डीएनए नमुना घेतला असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. आरोपी भाऊ सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Rape

    पुढील बातम्या