Home /News /videsh /

इमरान सरकार संकटात, पाकिस्तानात विरोध प्रदर्शनाला जोर

इमरान सरकार संकटात, पाकिस्तानात विरोध प्रदर्शनाला जोर

पाकव्यापत काश्मीरमधील (PoK) मुजफ्फराबादमध्ये मंगळवारी इमरान खान (Imran Khan Govt) सरकारच्याविरोधात प्रदर्शन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारला इशाराही दिला.

    मुजफ्फराबाद 23 फेब्रुवारी : पाकव्यापत काश्मीरमधील (PoK) मुजफ्फराबादमध्ये मंगळवारी शिक्षकांनी इमरान खान (Imran Khan Govt) सरकारच्याविरोधात प्रदर्शन केलं. यावेळी शेकडो शिक्षक वेतन वाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. शिक्षकांचं हे प्रदर्शन गेल्या एका आठवड्यापासून सुरू आहे. मात्र, मंगळवारी याला उग्र रुप आल्याचं पाहायला मिळालं. सरकारी शिक्षकांनी सरकारला काम न करण्याची धमकी दिली आहे. शिक्षकांचं असं म्हणणं आहे, की सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. एका प्रदर्शनकर्त्यानं म्हटलं, की हा आमचा अधिकार आहे. आम्हाला वेतनवाढ हवी आहे. जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहातील. इमरान खान सरकारला इशारा - प्रदर्शनकर्त्यांनी सरकारला इशार देत म्हटलं, की सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही साधारण निवडणूकाही विसरुन जाताल. इमरान खान सरकारला इशार देत आणखी एकानं म्हटलं, की आम्ही शाळा बंद करणार नाही, मात्र आम्ही रस्ते ब्लॉक करू. ते म्हणाले, की सरकारकडे शेवटी काहीच मार्ग उरणार नाही. आम्ही सरकारी कामांचा बहिष्कार करू. यात शिकवणं, निवडणुकांसंदर्भातील कामं आणि बोर्डाची काम यांचा आम्ही बहिष्कार करू. प्रदर्शनकर्त्यांनी म्हटलं, की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमची कामं सुरू करणार नाही. आमची मागणी योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या