जाहिरात
मराठी बातम्या / देश / ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाठ, देशभरातील 16 नेत्यांचा सहभाग

ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाठ, देशभरातील 16 नेत्यांचा सहभाग

ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाठ, देशभरातील 16 नेत्यांचा सहभाग

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. ही बैठक नुकतीच पार पडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamta Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (President Election 2022) पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक (Opposition Leaders Meet) बोलावली होती. ही बैठक नुकतीच पार पडली असून यात ममता बॅनर्जी वगळता कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झालेले नव्हते. पण तरीही या बैठकीत 17 पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्ष (AAP), BJD आणि TRS यांनी बैठकीला पाठ दाखवली. ममता बॅनर्जींनी राष्ट्रपतीपदासाठीच्या बोलावलेल्या बैठकीत सहभागी झालेले पक्ष आणि नेत्यांची नावे : 1. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, रणदीप सुरजेवाला आणि जयराम रमेश 2. TMC कडून स्वत: पक्षाध्यक्षा ममता बनर्जी 3. आरजेडीकडून खासदार मनोज झा 4. सीपीएमकडून ई करीम 5. सीपीआईहून बिनॉय विश्वम 6. JDS कडून HD देवेगौडा आणि कुमारस्वामी 7. डीएमकेकडून T R Balu 8. शिवसेनाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि सुभाष देसाई 9. समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव 10. PDP कडून महबूबा मुफ्ती 11. IUMLकडून ई टी मोहम्मद बशीर 12. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार 13. RSPकडून N K प्रेमचंद्रन 14 . RLD कडून जयंत चौधरी 15. सीपीआईएमएलकडून दीपांकर भट्टाचार्य 16. नॅशनल कांफ्रेंसकडून उमर अब्दुल्ला आईटी ( अयोध्येत महाराष्ट्रातील भाविकांसाठी 100 खोल्यांचं महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरेंची घोषणा ) राष्ट्रपतीपदासाठी 18 जूनला मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीतील कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती. ममता यांनी विरोधी पक्षांच्या आठ मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना पत्र पाठवलं होतं. पण या बैठकीला ममता बॅनर्जी वगळता एकाही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच 22 पैकी जवळपास 16 नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या बाजूचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु होती. पण माकप नेते सीताराम येचुरी यांनी शरद पवार हे विरोधी पक्षाचे उमेदवार नसतील. आम्ही इतर नावांवर विचार करत आहोत, असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून शरद पवार याचं नाव बाहेर पडल्याचं चित्र आहे. दरम्यान, विरोधी पक्षाच्यावतीने नेमकं कुणाला उमेदवारी दिली जाते, याकडे देशाचं लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात