Home /News /national /

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने घेतला बळी?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने घेतला बळी?

Chhota Rajan Dies: छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते.

    नवी दिल्ली, 7 मे: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण (Chhota Rajan Dies) झाल्यानंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. छोटा राजनला तिहार तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक दिवस त्याची प्रकृती अस्थित होती. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त समोर आलं आहे. छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. हे ही वाचा-Covid-19 in India: कोरोनाचं विक्राळ रूप; देशात दर तासाला 150 रुग्णांचा जातोय जीव गेल्या काही दिवसांपूर्वी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला बरी केली होती. तिहार तुरुंग आणि दिल्ली पोलिसांकडून अद्याप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूसंबंधित अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. हा प्रकार समोर आल्यानंतर एम्स रुग्णालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुरुंगात असतानाही अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.
    First published:

    Tags: AIIMS, Breaking News, Chhota rajan, Covid-19, Crime, Death, Delhi, India, Underworld don

    पुढील बातम्या