जाहिरात
मराठी बातम्या / देश / महिन्याभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या छत्तीसगड काँग्रेसचा युवा नेता पारस गोस्वामींनं संपवलं जीवन

महिन्याभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या छत्तीसगड काँग्रेसचा युवा नेता पारस गोस्वामींनं संपवलं जीवन

महिन्याभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या छत्तीसगड काँग्रेसचा युवा नेता पारस गोस्वामींनं संपवलं जीवन

Congress Leader Suicide: शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह कोंडागाव (Kondagaon) येथील त्यांच्या घरातच आढळून आला.

छत्तीसगड, 26 जून: छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातले काँग्रेसचे (Congress) तरुण नेते पारस गोस्वामी यांनी शुक्रवारी (25 जून) गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह कोंडागाव (Kondagaon) येथील त्यांच्या घरातच आढळून आला. ‘दैनिक भास्कर’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पारस गोस्वामी हे मजदूर संघाचे (Mazdur Sangh) जिल्हाध्यक्षही होते. मनमिळाऊ आणि मिळून-मिसळून वागणारे नेते अशी गोस्वामी यांची ख्याती होती. त्यामुळे ते स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेते होते. म्हणूनच त्यांनी केलेल्या आत्महत्येबद्दल आश्चर्य आणि शोक व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आल्याची बातमी कळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला. शनिवारी (26 जून) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कौटुंबिक वादातून (Family Matters) त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी याबाबत तातडीने तपास सुरू केला आहे. त्यांच्या मित्रमंडळींची, तसंच जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातूनच या आत्महत्येचे काही धागेदोरे उलगडू शकतील, असा विश्वास पोलिसांना आहे. हेही वाचा-  धक्कादायक! कॅन्युला लावून मुंबईच्या निवासी डॉक्टरची आत्महत्या ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, आडका छेपडा वॉर्डमध्ये (Aadaka Chhepada Ward) राहणाऱ्या पारस गोस्वामी यांनी आत्महत्या (Suicide) केल्याचं शुक्रवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आलं. यापूर्वीही एकदा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका महिन्यापूर्वीच त्यांनी विषारी पदार्थ (Poison) खाऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.  मात्र त्यांच्या मित्रांना वेळीच हे कळलं. त्यामुळे त्यांनी पारस यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. लगेचच उपचार झाल्यामुळे त्या वेळी त्यांचा जीव वाचला होता. तेव्हा त्यांनी उद्विग्न होऊन मित्रांना सांगितलं होतं, की ‘तुम्ही आत्ता मला वाचवलंत; पण असं कधीपर्यंत वाचवणार आहात?’ पारस यांच्या त्या प्रश्नाचा अर्थ आता त्यांच्या मित्रांना लागला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे काही कौटुंबिक कारण असल्याचा कयास बांधला जात आहे. पारस हे आपल्या घरातले एकमेव कमावती व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी चौथीत शिकते, तर छोटा मुलगा चार वर्षांचा आहे. हेही वाचा-  आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या BJP कार्यकर्त्यांचा LIVE Video पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात पारस गोस्वामी यांचा पुढाकार असायचा. त्यांची कार्यक्षमता पाहूनच त्यांना कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख मोहन मरकाम आणि सरचिटणीस मनीष श्रीवास्तव यांनी पारस यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात