Home /News /mumbai /

दहिसर चेक नाक्यावर BJP कार्यकर्ते आक्रमक, चक्का जाम करणाऱ्या आंदोलकाचा LIVE Video

दहिसर चेक नाक्यावर BJP कार्यकर्ते आक्रमक, चक्का जाम करणाऱ्या आंदोलकाचा LIVE Video

Maharashtra OBC Reservation: मुंबईतल्या दहिसर चेक नाक्यावरील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवरेवरही भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

    मुंबई, 26 जून: स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण ( obc reservation) रद्द करण्यात आल्यामुळे भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे. मुंबईतल्या दहिसर चेक नाक्यावरील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवरेवरही भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. मुंबईतील दहिसर चेक नाकाजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी (bjp obc chakka jam protest) भाजप नेते आंदोलन करत आहेत. दुसरीकडे या आंदोलनामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनामुळे सामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आंदोलनास्थळी मुंबई पोलीस ऑडिशन आयुक्त दिलीप सावंत, डीसीपी डॉ. स्वामी उपस्थित आहेत. चेक नाक्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, आमदार सुनील राणे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रवीण दरेकरही पोलिसांच्या ताब्यात  ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (bjp protest against obc reservation) हेही वाचा- अनिल देशमुख प्रकरणावर संजय राऊत भडकले, म्हणाले... मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, ओबीसी OBC

    पुढील बातम्या