Home /News /national /

मुंबईच्या निवासी डॉक्टरची अजमेरमध्ये आत्महत्या, इंजेक्शन घेऊन संपवलं आयुष्य

मुंबईच्या निवासी डॉक्टरची अजमेरमध्ये आत्महत्या, इंजेक्शन घेऊन संपवलं आयुष्य

Mumbai Doctor Suicide: जवाहरलाल नेहरु ( JLN Hospital) रुग्णालयाच्या ENT युनिटमध्ये काम करणाऱ्या निवासी डॉक्टरनं आत्महत्या (Suicide) केली आहे.

    अजमेर, 26 जून: जवाहरलाल नेहरु ( JLN Hospital) रुग्णालयाच्या ENT युनिटमध्ये काम करणाऱ्या निवासी डॉक्टरनं आत्महत्या (Suicide) केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. खोलीचा दरवाजा तोडून डॉक्टरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. डॉक्टरचा (Doctor) मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत निवासी डॉक्टर हा मुंबईचा रहिवासी आहे. डॉ. अक्षय कुमार अंकारे असं मृत डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. अक्षय आधी रुग्णालयात आला आणि त्यांच्या हातात कॅन्युला (Cannula) लावला आणि नंतर तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं ड्रिपच्या साहाय्यानं स्वतःला इंजेक्शननं देत आत्महत्या केली आहे. अक्षयच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज येणार असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल. अशी उघडकीस आली घटना अक्षयचे मित्र त्याला सारखे फोन करत होते. मात्र तो फोनला प्रतिसाद देत नव्हता. शेवटी काही मित्र त्याच्या घरी गेले. अक्षयच्या घराचा दरवाजा आत मधून बंद होता. पण आतमधून काहीच प्रतिसाद येत नव्हता. बराच वेळ झाल्यानंतर अक्षयच्या मित्रांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अक्षयला फोन केला. पण त्यांचाही फोन त्यानं उचलला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना ठाण्याला याबाबतची माहिती कळवली. हेही वाचा- हेमंत करकरेंवर प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या... माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अक्षयच्या खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा डॉ. अक्षय खोलीत पडला होता. सहकाऱ्यांनी त्याला तपासले असता. त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे. मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. दरम्यान अक्षयच्या संपूर्ण खोलीची तपासणी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून करण्यात आली. अभ्यासात होता हुशार मुंबईचा रहिवासी डॉ. अक्षय कुमार अंकारे मेडिकल कॉलेजमध्ये ईएनटी यूनिटमध्ये शिक्षण घेत होता. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, तो अभ्यासात खूप हुशार होता. गेल्या वर्षभरापासून कोविडच्या रुग्णांची सेवा केली तसंच गेल्या काही दिवसांपासून तो ब्लॅक फंगसच्या रुग्णांचे ऑपरेशन आणि वॉर्डमध्ये काम करत होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sucide, Suicide case

    पुढील बातम्या