Home /News /videsh /

नवं संकट! हवेतून पसरतो कोरोना? वुहानच्या 2 रुग्णांलयातील हवेत आढळला व्हायरस

नवं संकट! हवेतून पसरतो कोरोना? वुहानच्या 2 रुग्णांलयातील हवेत आढळला व्हायरस

वुहानमध्ये याबाबत संशोधन सुरू असून लवकरच याचा खुलासा होईल

    वुहान, 29 एप्रिल : कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) देशभरात संशोधन केलं जात आहे. हा व्हायरस चीनमधील वुहान (Wuhan) या भागातून पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे चीनचे वैज्ञानिक लॅबसह वातावरणात यासंदर्भात काही माहिती मिळते का? याबाबत शोध घेतला जात आहे. यातच त्यांना वुहानमधील 2 रुग्णालयातील हवेत सापडलेल्या ड्रॉपलेटमध्ये 1 इंचाचे 10000 व्या भागाइतके कोरोना व्हायरसचे आरएनए (RNA) सापडले आहेत. यापूर्वीदेखील अशा स्वरुपाचा शोध करण्यात आला आहे. मात्र सामान्य वातावरणात कोरोना व्हायरस हवेत सापडणे चांगला संकेत नाही. रुग्णालयातील मिळालेल्या हवेच्या सॅम्पलमध्ये मिळालेला कोरोना व्हायरसच्या आरएनएने कोरोना पसरू शकतो वा नाही, याबाबत निकाल आलेला नाही. मात्र संशोधकांचं म्हणणं आहे की इतकी छोटी ड्रॉपलेट ही बोलत असताना वा श्वास घेत असताना श्वसन प्रक्रियेत सहजपणे पोहोचू शकते. काही विशेषज्ञांनुसार कोरोना हवेच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक नमुना घेतल्यानंतर आता शास्त्रज्ञ या गोष्टींची चौकशी करतील वुहानमधील रूग्णालयात संशोधन करणारे वैज्ञानिक आता रुग्णालयातील हवेतून कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकते की नाही हे शोधून काढण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये शास्त्रज्ञ हवेचे संशोधन करुन हवेत कोरोना विषाणूचा हानी पोहोचवणारा भाग सापडला आहे कि नाही याचा शोध घेतली. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात संसर्गजन्य रोग आणि एकविसाव्या शतकातील आरोग्य जोखमीवरील स्थायी समितीचे प्रमुख हार्वे व्ही. फिनबर्ग असे म्हणतात की, "या संशोधनात अद्याप हे उघड झाले नाही की हवेतील विषाणू त्याची संख्या वाढवू शकतो का? संशोधनाअंती याचा नेमका खुलासा होईल. संबंधित-प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत इरफान खानचे दमदार हे डायलॉग
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Wuhan

    पुढील बातम्या