जाहिरात
मराठी बातम्या / देश / निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू; ग्राहक न्यायालयाने दिली 17 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?

निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू; ग्राहक न्यायालयाने दिली 17 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?

निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

कुड्डालोर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयाला रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आठ वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू झालेल्या पुरुषाला 17.25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कुड्डालोर, 19 फेब्रुवारी : अनेकदा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव जातात. अशा प्रकरणात बऱ्याचदा कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. मात्र, एका प्रकणात ग्राहक न्यायालयाने खाजगी रुग्णालयाने चांगला दणका दिला आहे. कुड्डालोर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने अलीकडेच चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयाला आठ वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू झालेल्या पुरुषाला 17.25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी 2014 मध्ये फूल विक्रेते विनोद कुमार यांनी त्यांची पत्नी व्ही कलैवानी यांना प्रसूतीसाठी डब्ल्यूसीएफ रुग्णालयात दाखल केले होते. आयोगाचे अध्यक्ष डी गोपीनाथ आणि सदस्य व्हीएन पार्थिबन आणि टी कलैयारासी यांनीही तामिळनाडूच्या राज्य वैद्यकीय परिषदेला रुग्णालयाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वाचा - प्रियकर बोलत नाही म्हणून तरुणीचं धक्कादायक कृत्य, आईच्या छातीवर बसली अन् नंतर.. काय झालं? टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर तिला रक्तस्त्राव झाला, त्यामुळे तिचा रक्तदाब कमी झाला. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने महिलेचे गर्भाशय काढले. मात्र, हिस्टेरेक्टॉमी करूनही तिचा रक्तस्त्राव थांबला नाही आणि डॉक्टरांनी पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया केली. त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि 16 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांचे निधन झाले.

News18लोकमत
News18लोकमत

चौकशी आयोगाच्या निर्णयासाठी रुग्णालय जबाबदार चौकशी आयोगाला असे आढळून आले की महिलेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी इतर उपचार न करता गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आणि योग्य काळजी न घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात