औरंगाबाद, 19 फेब्रुवारी, अविनाश कानडजे : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने बोलणे थांबविले याचा राग आल्यानं एका तरुणीनं आपल्याच आईच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना वेळीच शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानं शेजारी मदतीला धावले आणि या मुलीच्या तावडीतून महिलेची सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. आपला प्रियकर आपल्याशी बोलत नाही याला आई जबाबदार असल्याचं या मुलीला वाटत होतं. नेमकं काय घडलं? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्या प्रयिकराने बोलंण बंद केलं होतं. याबद्दल ही मुलगी आपल्या आईला दोष देत होती. आईमुळेच हे सर्व घडल्याचं तिला वाटत होतं. प्रियकर बोलत नसल्यानं ही तरुणी होस्टेल सोडून तिच्या घरी आली होती. घरी ती सतत चिडचीड करत होती. हे सर्व आईमुळे घडलं असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिने आपल्याच आईच्या छातीवर बसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन महिलेची या मुलीच्या तावडीतून सुटका केली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. हेही वाचा : बल्बसाठी सीसीटीव्ही चेक केले, पण महिलेला ‘त्या’ अवस्थेत बघून रहिवाशी हादरले; मुंबईतील धक्कादायक घटना तरुणी मनोविकार तज्ज्ञाकडे दाखल या मुलीने आपल्याच आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकानं घटनास्थळी धाव घेऊन या मुलीला ताब्यात घेतलं. तिला मनोविकार तज्ज्ञाकडे दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.