• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही होणार कोरोना रुग्णांवर उपचार; 'या' राज्याने सुरू केली प्रक्रिया

फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही होणार कोरोना रुग्णांवर उपचार; 'या' राज्याने सुरू केली प्रक्रिया

हॉटेल्सना (Hotels) हॉस्पिटलसह (Hospital) जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 मे : आता रुग्णालयात बेडच्या (hopsital bed) कमतरतेमुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही. लवकरच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये (five star hotel) कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. मोठ्या हॉटेल्सना मोठ्या हॉस्पिटलशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांना टेकओव्हर करणं सुरू केलं आहे. दिल्लीतील 5 मोठ्या हॉटेल्सना 5 मोठ्या रुग्णालयांशी जोडलं जाणार आहे. यामध्ये सूर्या हॉटेल (Surya Hotel), क्राउन प्‍लाजा (Crowne Plaza), सिद्धार्थ हॉटेल (Siddharth Hotel), शेरेटन (Sheraton Hotel) आणि जीवितेश हॉटेलचा (Jeevitesh Hotel) समावेश आहे. दिल्ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पाच हॉटेल्ससह जी रुग्णालयं जोडली जाणार आहेत त्यामध्ये सरिता विहारमधील अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital), बत्रा हॉस्पिटल (Batra Hospital), राजेंद्र प्‍लेसमधील बीएल कपूर हॉस्पिटल (BL Kapoor Hospital), साकेतमधील मॅक्स हॉस्पिटल (Max Hospital), करोल बागमधील सर गंगा राम हॉस्पिटल (Gangaram Hospital) यांचा समावेश आहे. हे वाचा - हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र सूत्रांच्या माहितीनुसार, सूर्या हॉटेल अपोलो हॉस्पिटलशी, क्राउन प्लाझा हॉटल बत्रा हॉस्पिटलशी, सिद्धार्थ हॉटेल बी एल कपूर हॉस्पिटलशी, शेरेटन साकेत मॅक्स हॉस्पिटलशी आणि जीवितेश हॉटेल गंगा राम हॉस्पिटलशी जोडण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आता या रुग्णालयात गरजेनुसार या हॉटेलमध्ये ठेवता येईल आणि तिथंच त्यांच्यावर उपचार केले जातील. हे वाचा - चिकनमार्फत पसरेल कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस; शास्त्रज्ञांनी केलं सावध दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीलवाल यांनी सांगितल्यानुसार, रुग्णालयात बेड कमी पडत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यात अडचण येऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 2100 रुग्ण आता हॉस्पिटलमध्ये आहेत. एक आठवड्यापूर्वी 4500 बेड होते, त्यात 2100 बेड वाढवण्यात आलेत. 5 जूनपर्यंत 3600 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली जाईल. सरकारी रुग्णालयातही दिल्ली सरकारने चांगली व्यवस्था केली आहे. याशिवाय हॉटेलही टेकओव्हर केले जात आहेत, जेणेकरून कोरोना रुग्णांवर उपचार होतील.
  Published by:Priya Lad
  First published: