Home /News /national /

चरणजीत चन्नी बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह घेतली CM पदाची शपथ

चरणजीत चन्नी बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह घेतली CM पदाची शपथ

काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पंजाबमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ सोमवारी शांत झाली आहे. काँग्रेस नेते (Congress Leader) चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ (Take Oath as New CM) घेतली आहे.

    चंदीगड, 20 सप्टेंबर: पंजाबमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ सोमवारी शांत झाली आहे. काँग्रेस नेते (Congress Leader) चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ (Take Oath as New CM) घेतली आहे. तर सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) आणि ओपी सोनी (OP Soni) यांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM) म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि हरीश रावत उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीसाठी 40 जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पंजाबच्या राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी यांना शपथ दिली. चन्नी आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री पद भूषवणारे पहिले दलित आहेत. 58 वर्षीय चन्नी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून ओपी सोनी यांचं नाव अवघ्या अर्धा तास आधी समोर आलं आहे. हेही वाचा-...अन्यथा 'ते' लग्न कायदेशीर! अल्पवयीन मुलींच्या विवाहाबाबत हायकोर्टाचा निर्णय चन्नी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून ब्रह्म मोहिंद्रा यांची वर्णी लागेल असा दावा केला जात होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, आमदारांच्या एकमतानंतर सोनिया गांधी यांनी  चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे. हेही वाचा-...तर राखी सावंतही महात्मा गांधी असती, वादग्रस्त वक्तव्यावर सभापतीचं स्पष्टीकरण खरंतर पंजाबमध्ये 34 टक्क्याहून अधिक दलित समुदाय आहे, शिवाय 34 आरक्षित मतदारसंघ देखील आहेत. भाजपने आधीच दलित व्यक्तीच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा केली आहे. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दलाने बहुजन समाज पक्षाशी राजकीय युती करून दलित मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात काँग्रेस पक्षाने चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री पद देत विरोधी पक्षांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Panjab

    पुढील बातम्या