• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ...तर राखी सावंतही महात्मा गांधी असती, वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभा सभापतीचं स्पष्टीकरण

...तर राखी सावंतही महात्मा गांधी असती, वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभा सभापतीचं स्पष्टीकरण

उन्नाव येथील आमदार हृदय नारायण दिक्षित यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

उन्नाव येथील आमदार हृदय नारायण दिक्षित यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

उन्नाव येथील आमदार (MLA from Unnao) हृदय नारायण दिक्षित (Hriday Narayan Dixit) यांनी एक वादग्रस्त विधान (Controversial statement) केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) केली आहे.

 • Share this:
  लखनऊ, 20 सप्टेंबर: गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती (Speaker of Uttar Pradesh Legislative Assembly) आणि उन्नाव येथील आमदार (MLA from Unnao) हृदय नारायण दिक्षित (Hriday Narayan Dixit) हे वादग्रस्त विधान (Controversial statement) करताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दिक्षित हे बॉलिवुडची ड्रामा क्विन राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) करताना दिसत आहेत. पण संबंधित व्हायरल व्हिडीओबाबत दिक्षित यांनी नुकतचं स्पष्टीकरण दिलं असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्पष्टीकरण देताना दिक्षित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, 'सोशल मीडियावर काही मित्र माझ्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. ज्यातून एक वेगळाच अर्थ निघत आहे.' त्यांनी पुढे सांगतिलं की, खरंतर संबंधित व्हिडीओ उन्नाव येथील प्रबुद्ध परिषदेतील माझ्या भाषणाचा भाग आहे. ज्यामध्ये संमेलन सूत्रधारांनी माझी ओळख 'एक प्रबुद्ध लेखक' अशी करून दिली होती. हेही वाचा-BREAKING : भाजपच्या माजी मंत्र्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या याच मुद्द्याला धरून त्यांनी पुढे सांगितलं की, 'केवळ काही पुस्तकं आणि लेख लिहिले म्हणून कोणीही प्रबुद्ध नाही होतं. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे. देशाने त्यांना 'बापू' म्हटलं. पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही गांधीजी होतील. मित्रांनो, कृपया माझं भाषण केवळ वास्तविक संदर्भाने घ्या. धन्यवाद.' हेही वाचा-चरणजीत सिंह चन्नी आज घेणार CM पदाची शपथ; कॅप्टन यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स काय म्हणाले होते दिक्षित? हृदय नारायण दिक्षित महात्मा गांधींविषयी प्रबुद्ध परिषदेत म्हणाले होते की, 'गांधीजी कमी कपडे घालायचे, धोतर घालायचे, गांधीजींना देशाने बापू म्हटलं. कपडे उतरवून कोणी महान बनलं असतं, तर राखी सावंत आता महान असत्या.' दिक्षित पुढे म्हणाले की, मी 6 हजार पुस्तके वाचली आहेत. तसेच त्याचं विश्लेषणही केलं आहे. जर कोणी कमी कपडे घालून किंवा कपडे उतरवून मोठे झाले असते. तर आज राखी सावंत महात्मा गांधीपेक्षा मोठ्या झाल्या असत्या. दिक्षित यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: