कोरोनाचे मूळ उच्चाटन करणे आव्हानात्मक, तज्ज्ञांकडून डिस्चार्ज प्रोटोकॉल जारी करण्याचे आदेश

कोरोनाचे मूळ उच्चाटन करणे आव्हानात्मक, तज्ज्ञांकडून डिस्चार्ज प्रोटोकॉल जारी करण्याचे आदेश

अनेक देशांमध्ये उपचारानंतरही रुग्णांला पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होत आहेत. यानुसार हा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तात अँटीबॉडीज तयार होत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव वाढत चालला आहे. सध्या राज्यातील कोरोना (Covid - 19) व्हारसची संख्या 2000 च्या पार गेली असून देशातही तब्बल 9152 पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे.

मात्र जर आपण लक्षपूर्वक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिला तर यात मोठ्या संख्येने वाढ होत असल्याचे दिसून येईल. विशेष म्हणजे ज्या कोरोनाबाधितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्यांनाही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे काही केसेवरुन दिसून येत आहे. नोएडा येथील दोन कोरोनातून बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. असेच प्रकरण दक्षिण कोरियातही (south korea) पाहायला मिळाले आहे. येथील 91 येथील रुग्णांच्या सुरुवातीच्या दोन रिपोर्टनुसार ते कोरोना निगेटिव्ह होते. मात्र तिसऱ्या रिपोर्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनाबाबात रुग्णांचा डिस्चार्ज प्रोटोकॉल पुन्हा जारी करण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकेतील मे मेयो क्लिनिकमधील संक्रमण विशेष तज्ज्ञ डॉ. प्रिया संपत कुमार यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचे आरटी-पीसीआर परिक्षण सर्वात उपयुक्त आहे. यामुळे निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी केली जाते. भारतात कोरोनाबाधितांची संख्या जलद गतीने वाढत आहे. आतापर्यंत देशात 9152 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 308 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर अनेक तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत. मात्र दररोज कोरोनाबाबतचा नवीन प्रकार समोर येत आहे. अनेक देशांमध्ये उपचारानंतरही रुग्णांला पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होत आहेत. यानुसार हा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तात अँटीबॉडीज तयार होत नाही. ज्यामुळे बरा झालेला रुग्ण पुन्हा आजारी पडतो. चीनमधील फुदान विश्वविद्यालयातील रुग्णालयातील 130 जण स्वस्थ झाले आहेत. या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजची तपासणी केली. ज्यामध्ये 8 टक्के म्हणजेच 10 रुग्णांमध्ये अँटीबॉडीज मिळाले नाहीत. यानुसार केवळ 30 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज मिळाले मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.

संबंधित -

PM मोदी उद्या देशाला संबोधित करणार, लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

कोरोनाच्या संकटात अहमदनगरमध्ये सारी रोगाचा कहर, आतापर्यंत 15 जणांना झाली लागण

First published: April 13, 2020, 3:22 PM IST

ताज्या बातम्या