पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार, लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार, लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून एक संदेश दिला आणि त्याच दिवशीच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (14 एप्रिल) देशातील नागरिकांना संबोधित करणार आहे. कोरोना (Coronavirus) आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2000 च्या पार गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. काही राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवली आहे. जानेवारी महिन्याच्या 31 तारखेला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर हळूहळू देशभरात कोरोना झपट्याने वाढत चालला आहे.

उद्या सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 15 एप्रिल रोजी या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र असे असले तरी पंजाब, महाराष्ट्र, ओडिसा या राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 30 एप्रिलपर्यंत केली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. देशभरात लॉकडाऊन असला तरी काही राज्यांमध्ये जेथे कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा ठिकाणी काही अंशी लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून एक संदेश दिला आणि त्याच दिवशीच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. आता हे 21 दिवस येत्या 14 तारखेला संपत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

WHOने दिला इशारा

WHOचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करण्याआधी होणाऱ्या परिणामांचा विचार करा. लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला. आफ्रिकेतील काही देश लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत आहेत. या देशांना सावध करण्यासाठी टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

टेड्रॉस यांच्या मते, इटली, जर्मनी, स्पेन आणि फ्रान्स अशा काही युरोपीय देशांमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत आहे. याचे एक कारण लॉकडाऊन आहे. सद्यरिस्थितीत कोणत्याही देशाकडे ठोस उपाय नाही आहेत, त्यामुळे लॉकडाऊन हटवणे ही धोक्याची बाब असेल, असेही टेड्रॉस यांनी सांगितले.

First published: April 13, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या