निर्भयाच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी होणं कठीण? हे आहे कारण

निर्भयाच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी होणं कठीण? हे आहे कारण

निर्भयाच्या आईचे वकील जितेंद्र झा यांनी गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी आणखी उशीर लागणार असल्याचं सांगितलं आहे. नव्या डेथ वॉरंट विरोधात आरोपीचे वकील हायकोर्टात जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जानेवारी:   निर्भयाच्या गुन्हेगारांना 22 जानेवारीला फासावर लटकवण्यात येणार होतं. मात्र आता चौघा नराधमाच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता निर्भयाच्या मारेकऱ्यांना 1 फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. मारेकऱ्यांच्या फाशीची तारीख बदलण्यात आल्यानं निर्भयाची आई निराश झाली आहे. मला न्याय हवा आहे. माला माहित नाही कोर्ट कसा न्याय देणार पण न्याय हवा असल्याचं निर्भयाची आई आशा देवी यांनी सांगितलं आहे. आरोपींना जे हव आहे तसच होत असल्याचं आशा देवी म्हणाल्या. येवढचं नाही तर आमचं सिस्टिमच आरोपींचं ऐकणार असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

चौघा दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी

निर्भयाच्या चौघा दोषींना आता 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्टानं आरोपींच्या फाशीची नवी तारीख दिली आहे. अतिरिक्त संत्र न्यायाधीश सतीश कुमार आरोडा यांनी आरोपी मुकेश कुमार सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी केली. मुकेश कुमारसिंह यानं फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकेतून केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी 1 फेब्रुवारीचं नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे.

1 फेब्रुवारीला फाशी होणार की नाही?

निर्भयाच्या आईचे वकील जितेंद्र झा यांनी 1 फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर शंका उपस्थित केली आहे. फाशी देण्यासाठी आणखी 74 ते 75 दिवस लागणार असल्याची माहिती जितेंद्र झा यांनी दिली आहे. या पैकी कोणत्याही दोषींनी जर 31 जानेवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली तर त्यांची फाशी थांबू शकते. कोर्टानं आरोपींच्या विरोधात नवा डेथ वॉरंट जारी केला असला तरी फाशी त्याचं तारखेला होणार की नाही अशी शंका निर्भयाच्या आईच्या वकिलानं व्यक्त केली आहे. आरोपींचे वकील फाशीची शिक्षा लांबवण्याचा प्रयत्न करताहेत. तसेच आरोपीच्या वकिलानं एका दोषीच्या जन्म तारखेचा मुद्दा उपस्थित केला आहे. घटना घडली तेव्हा एका आरोपीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचा मुद्दा आरोपीच्या वकिलानं उपस्थित केला असल्याची माहिती आहे.

आरोपी हायकोर्टात जाणार?

संविधानाचं पालन न करता न्यायाधिशानं नवं डेथ वॉरंट जारी केल्याचं आरोपींच्या वकिलांचं म्हणण आहे. नवं डेथ वॉरंट जारी करताना न्यायिक प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याचं आरोपींच्या वकिलानं सांगितलं आहे. आरोपींना अजुनही फाशीविरोधात कायदेशीर हक्क मिळत असल्याचं वकिलानं सांगितलं आहे. न्यायाधिशांना याप्रकरणी म्हणण ऐकून घेतलं नाही. त्यामुळं आरोपीचे वकील हायकोर्टात नव्या डेथ वॉरंट विरोधात अपील करणार आहे.

राष्ट्रपतींनी मुकेश सिंह यांची दया याचिका फेटाळली

निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना 2012 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी काही दिवसांवर असताना आरोपी मुकेश सिंह यानं राष्ट्रपतीकडे फाशीविरोधात दयेचा अर्ज केला होता. मात्र राष्ट्रपतींनी मुकेश याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळं मुकेश सिंह याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झालं होतं.

काय आहे प्रकरण?

डिसेंबर2012 साली निर्भयावर दिल्लीतील धावत्या बसमध्ये सामूहिक बलत्कार करण्यात आला होता. रात्री निर्भया आणि त्याचा मित्र दोघे जात असताना दोघांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं पाच आरोपींनी बसमध्ये घेतलं. त्यानंतर तिच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करून निर्भयासोबत सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर निर्भयाला अमानुष मारहाण करून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. त्यानतंर उपचारा दरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन करण्यात आली होती.

हेही वाचा - साध्वी प्रज्ञासिंह यांना संशयास्पद पावडरचं पाकिट, नांदेडच्या डॉक्टरला अटक

काश्मिरी पंडित म्हणतायेत, हम वापस आएंगे...ट्विटरवर ट्रेंड होतोय त्यांचा संदेश

First published: January 18, 2020, 5:52 PM IST

ताज्या बातम्या