मुंबई 24 डिसेंबर : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानच्या समुद्रामध्ये असलेला खडकाळ भाग ‘राम सेतू’ म्हणून ओळखला जातो. या पुलाची निर्मिती प्रभू श्रीरामचंद्रांनी केली होती, अशी आख्यायिका आहे. रामसेतू हा अनेक वर्षांपासून वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक हिंदूंसाठी हा एक भावनिक विषय आहे. रामायण या भारतीय महाकाव्यात वर्णन केलेला हा पूल खरंच अस्तित्वात होता का याबद्दल मतमतांतरं आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही हा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘या पुलाचं अस्तित्व ‘अचूकपणे’ सिद्ध केलं जाऊ शकत नाही,’ असं सरकारच्या वतीने गुरुवारी (22 डिसेंबर) संसदेत सांगण्यात आलं आहे. पण समुद्रात दिसत असलेली खडकाळ संरचना पुलाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अस्तित्वाची ग्वाही देत आहे, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. Corona update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून अलर्ट; केंद्र सरकारने जारी केलं पत्र ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अवकाश राज्य मंत्री जितेंद्रसिंह यांनी राज्यसभेत रामसेतूबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना काही माहिती दिली. ते म्हणाले, “राम सेतूच्या अस्तित्वाचा प्रश्न विचारात घेतल्यास, आम्हाला त्याचा शोध घेण्यास काही मर्यादा येत आहेत. त्यासाठी 18 हजार वर्षांहून अधिक काळ मागे जावं लागेल. पुराणातले दाखले विचारात घेतले तर या पुलाची लांबी सुमारे 56 किलोमीटर होती. अंतराळ तंत्रज्ञानाद्वारे आम्ही काही प्रमाणात पुलाचे तुकडे आणि काही बेटं शोधण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामध्ये उथळ पाण्यातल्या चुनखडीच्या खडकांचाही समावेश आहे; पण ते पुलाचे अवशेष आहेत की नाही हे अचूकपणे सांगता येणार नाही.” भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी रामसेतूबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. रामसेतूचा उल्लेख करून, भारताच्या भूतकाळाचं वैज्ञानिक मूल्यांकन करण्यासाठी सरकारचं नियोजन आहे का, असा प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला होता. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. ‘या’ ठिकाणी देवाला दाखवला जातो दारूचा नैवेद्य; जिल्हाधिकारीपण करतात दारूनं पूजा सिंह म्हणाले, “तिथे अस्तित्वात असलेली रचना नेमकी कोणती होती, निश्चितपणे सांगणं कठीण आहे; पण पाण्यात सापडलेल्या खडकांची रचना विशिष्ट प्रकारची आहे. हा एक प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संकेत आहे. त्याद्वारे काही निष्कर्ष काढले जाऊ शकतात. अंतराळ विभाग या कामामध्ये व्यग्र आहे.” रामसेतूबद्दल हिंदू धर्मीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. याशिवाय, तो पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि समुद्रशास्त्रज्ञांच्याही कुतुहलाचा विषय आहे. या वर्षाच्या सुरुवातीला याबाबत एक चित्रपटही तयार करण्यात आला होता. अभिनेता अक्षय कुमारनं त्यात काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.