नवी दिल्ली , 23 डिसेंबर : चीनसह अमेरिका, दक्षिण कोरीया या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून, वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांकडून याबाबत एक पत्र राज्यांना पाठवण्यात आलं आहे. आगामी काळात कोणती खबरदारी घेण्यात यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पत्रात काय म्हटलं? येत्या काळात राज्यात अनेक सणोत्सव आहेत. या काळात कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे योग्य ती काळजी घेण्यात यावी असं या पत्रात म्हटलं आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्ष आढळतील त्याची तातडीने चाचणी करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, जसे की हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत, आवश्यक त्या ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे अशा अनेक सूचना या पत्राद्वारे राज्यांना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात भारताकडे आणखी एक शस्त्र, भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन सज्ज केंद्र सरकारकडून खबरदारी सध्या जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. हेही वाचा : Omicron BF.7: भारतात रुग्ण आढळल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितला खबरदारीचा उपाय भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन दरम्यान दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानांनी भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये शिर्डी तसेच त्र्यबकेश्वर यासारख्या देवस्थानांचा समावेश आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मास्क घालावं व कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.