मराठी बातम्या /बातम्या /देश /हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 24 तास तैनात राहणार CRPF कमांडो

हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 24 तास तैनात राहणार CRPF कमांडो

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)  यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारनं त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारनं त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारनं त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारनं त्यांची सुरक्षा वाढवली आहे. केंद्र सरकारनं ओवैसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. हैदराबादचे लोकसभा खासदार ओवैसी यांना CRPF कमांडो झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी 24 तास सीआरपीएफ कमांडो तैनात केले जातील.

गुरुवारी संध्याकाळी पिलखुवाच्या NH-9 वर असलेल्या छिजारसी टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर दोन हल्लेखोरांनी पाच राऊंड गोळीबार केला. सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर ओवैसी दुसऱ्या गाडीतून दिल्लीला रवाना झाले.

ओवैसीच्या गाडीवर गोळीबार

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) गुरुवारी संध्याकाळी मेरठहून परतत असताना त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. संबंधित घटनेचा आता लाईव्ह व्हिडीओ (live video) समोर आला आहे. टोल नाक्यावर (toll naka) त्यावेळी नेमकं काय घडलं हे जसच्या तसं तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झालं आहे. दरम्यान या घटनेतील हल्लेखोऱ्यांचा फोटो आता समोर आले आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

हल्लेखोर दोघंही मित्र

ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हल्लेखोऱ्यानं गुन्हा कबूल करून हल्ल्यामागचं कारण सांगितलं. दोन्ही आरोपी लॉ ग्रॅज्युएट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दोघेही चांगले मित्र असून एकाच कॉलेजमध्ये शिकले आहेत.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संबंधित घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एक लाल रंगाच्या शर्टमधील मुलगा टोल नाक्यावर ओवैसी यांच्या गाडीच्या जवळून जातो. यावेळी त्याच्या हातात काहीतरी आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी फायरिंगचा आवाज येतो. हल्लेखोर ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करतात. त्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हल्ला करणारा तरुण किती वेगात पळाला ते व्हिडिओत स्पष्टपणे जाणवत आहे. त्याला पळताना बाजूने जाणारी कारही दिसली नाही. त्यामुळे त्याचा पाय त्या कारमध्ये जातो आणि तो खाली पडतो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाच्या शर्टातील एक तरुण समोरुन येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तो ओवैसींच्या गाडीवर थेट गोळीबार करतो. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत हल्ला करणाऱ्या त्या दुसऱ्या तरुणाचा चेहराही दिसत आहे.

ओवैसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेला जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. घटनेनंतर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

First published:

Tags: Asaduddin owaisi, Assembly Election, Cctv footage, India, Live video viral, Toll naka, UP, UP Election