मुंबई, 07 मार्च : कोरोना व्हायरनं जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 80 देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतातही या विषाणूचा धोका जाणवू लागला आहे. भारतात 31 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. या कोरोना संदर्भात जगभरातील देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहेच. तर वेगवेगळ्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती देखिल केली जात आहे. केंद्र सरकारनं या संदर्भात भारतात एक उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडिया, टीव्ही, रेडिओसोबतच आता मोबाईलवरही खास कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी जनजागृती केली जात आहे. आपण समोरच्या व्यक्तीला फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट आणि त्यासंदर्भातील संदेश प्ले होतो. त्यातून जनजागृती करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी सरकारकडून हे प्रयत्न केले जात आहे. सरकारनं टेलिकॉम कंपन्यांसोबत टॅब करून हा उपक्रम राबवला आहे. हे वाचा- रुग्णालयातूनच पळाला कोरोनाग्रस्त रुग्ण, पोलिसांनी जारी केला अलर्ट आणि… कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणताही ठोस उपचार अद्याप शोधण्यात आलेला नाही. पण कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी काही प्राथमिक उपाय करणे आवश्यक आहे.miami.cbslocal.com च्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्कपेक्षा जास्त स्वच्छ पाण्याने हात धुणे हा प्रभावशाली उपाय आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं किंवा आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे. हे वाचा - कोरोनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, N-95 मास्कसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.