मुंबई, 07 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) विषाणूने साऱ्या जगभरात हाहाकार माजला आहे. जगातील तब्बल 80 देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही याचा धोका वाढला आहे. देशात 31 कोरोना संशयित रुग्ण असून, त्यातील तिघांवर यशस्वी वैद्यकिय चाचणी झाली आहे. एकीकडे कोरोनाला आळा बसण्यासाठी N-95 मास्कचा वापर वाढला आहे. तर, याबाबत आता मात्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकराच्या अन्न आणि औषध प्रशासनाने N-95 मास्कच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क देण्यात येणार नाही आहेत. औषध विक्रेत्यांनी याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाचा-कोरोना व्हायरसचं वाढतं संकट, सर्दी-खोकला ताप आल्यास असा ओळखा कोरोना
कोरोनाव्हायरसची वाढता संसर्ग पाहता मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ‘एन 95 मास्क’ बरोबर फेकण्याचे ‘मास्क’ही दुप्पट किमतीने विकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळं मास्कचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे केवळ डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच त्यांची विक्री करण्याचे आदेश औषध प्रशासनाने काढले आहेत.
वाचा-कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL
रुग्णांची संख्या पोहचली 31 वर
सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर 2 रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे.
वाचा-कोरोनाव्हायरसचा सर्वात धक्कादायक VIDEO, रुग्णालयात पडलाय 107 मृतदेहांचा खच
सर्दी-खोकला, ताप आणि कोरोना व्हायरस या आजारांमध्ये फरक काय?
कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते.