धक्कादायक! रुग्णालयातूनच पळाला कोरोनाग्रस्त रुग्ण, पोलिसांनी जारी केला अलर्ट आणि...

धक्कादायक! रुग्णालयातूनच पळाला कोरोनाग्रस्त रुग्ण, पोलिसांनी जारी केला अलर्ट आणि...

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातच रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्ण पळून गेला.

  • Share this:

भुवनेश्वर, 07 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरात भीतीचे वातावरण आहे. भारतही या धोक्यापासून वाचू शकलेला नाही. यातच एक धक्कादायक प्रकार ओडिशामध्ये घडला आहे. आयर्लंडचा एक संशयित नागरिक गुरुवारी येथील रुग्णालयातून पळून गेला. पोलीस तब्बल 10 दिवस त्याचा शोध घेत होते. अखेर ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमधील एका हॉटेलमध्ये सापडला, आता त्याला एका रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीलाही त्याच्याबरोबर ठेवण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या प्रकरणातील प्रोटोकॉलनुसार ते 14 दिवस वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

भुवनेश्वरच्या रुग्णालयातून पळालेला हा रुग्ण परदेशी असून एससीबी मेडिकल कॉलेज व रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर मंगलाबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. 26 फेब्रुवारीपासून हे व्यापारी दौर्‍यावर भारतात आले होते आणि ते भुवनेश्वरमधील हॉटेलमध्ये थांबले होते.

वाचा-कोरोनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, N-95 मास्कसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी

असा झाला रुग्ण फरार

37 वर्षीय रुग्णाला दोन दिवस ताप आला आणि त्याला सर्दी झाली, त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांसह तपासणीसाठी महानगरातील कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय कॅपिटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक पटनायक यांनी, "जेव्हा डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस दूर रहाण्याचा सल्ला दिला, तेव्हा सहाय्यकांनी सुचवले की, तेथे अधिक सुविधा असलेल्या एससीबी मेडिकल कॉलेज कटक येथे पाठवावे. त्यानंतर रुग्ण आणि त्याचा सहकारी दोघेजण एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेले”, अशी माहिती दिली. त्यानंतर हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. बी.एन. महाराणा यांनी, “हा रुग्ण रुग्णालयात आलाच नाही. त्यामुळे आम्ही लगेचच पोलिसांत तक्रार केली”, असे सांगितले.

वाचा-कोरोना व्हायरसचं वाढतं संकट, सर्दी-खोकला ताप आल्यास असा ओळखा कोरोना

10 दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला रुग्ण

हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला.या दोघांना कुणालाही सोडले नाही म्हणून कॅपिटल हॉस्पिटलचे अधिकारीही चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि त्यानंतर 10 दिवसांनी हा रुग्ण भुवनेश्वरमधील हॉटेलमध्ये सापडला.

वाचा-कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL

रुग्णांची संख्या पोहचली 31 वर

सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर 2 रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे.

First published: March 7, 2020, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading