मराठी बातम्या /बातम्या /देश /

रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नात, पत्नीचाही जिव्हाळ्याचा संबंध, दोन मुलींवर दु:खाचा डोंगर

रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नात, पत्नीचाही जिव्हाळ्याचा संबंध, दोन मुलींवर दु:खाचा डोंगर

रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नातं आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्या मनात सैन्यदल आणि सैनिकांच्या कुटुंबियांविषयी प्रचंड आत्मीयता होती.

रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नातं आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्या मनात सैन्यदल आणि सैनिकांच्या कुटुंबियांविषयी प्रचंड आत्मीयता होती.

रावत कुटुंबाचं सैन्यदलाशी जन्माचं नातं आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्या मनात सैन्यदल आणि सैनिकांच्या कुटुंबियांविषयी प्रचंड आत्मीयता होती.

  • Published by:  Chetan Patil

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : देशावर आज खूप मोठं संकट कोसळलं आहे. देशाचे पहिले सीडीएस आणि माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन झालं आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय वायूसेनेचे आणि लष्कराचे दिग्गज अधिकारी होते. विशेष म्हणजे भारतीयांचा अभिमान असलेले पहिले सीडीएस बिपीन रावत आपल्या पत्नीसह या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत आणखी 12 दिग्गज अधिकारी होते. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत रावत दाम्पत्यासह 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत बचावलेले एकमेव भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी आहेत. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. संपूर्ण देश त्यांचा प्राण वाचावा यासाठी प्रार्थना करत आहे. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये शोकाकूळ वातावरण आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेने देशाच्या 13 दिग्गजांना हिरावलं आहे. जगभरातून या घटनेवर दु:ख व्यक्त केलं जातंय.

मधुलिका रावत यांच्या मनात सैनिकांच्या पत्नींविषयी खूप आपूलकी

बिपीन रावत हे 63 वर्षांचे होते. रावत हे कुटुंबच प्रचंड शूर. रावत यांचे वडील एल एस रावत हे देखील सैन्यातच होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण सैन्यात होते. रावत यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. देशाची सेवा आणि सुरक्षेसाठी झोकून देणं, स्वत:ला समर्पित करणं हे त्यांच्या रक्तातच होतं. विशेष म्हणजे रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील प्रचंड संवेदनशील होत्या. त्यांनादेखील सैन्यदिलाविषयी, सैनिकांविषयी प्रचंड आत्मीयता होती. सैन्य म्हटलं की लढाई, शत्रूशी दोन हात करणं, शत्रूवर विजय मिळवणं, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणं आणि त्यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करणं हे आलंच. देशाच्या सीमेवर आज लाखो सैनिक भर उन्हात, थंडीत दिवस-रात्र उभे असतात. या जवानांप्रती त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांप्रती मधुलिका यांच्या मनात खूप कळवळा आणि पोटतिडकी होती. त्यासाठीच त्या सैन्यातील जवानांच्या पत्नी आणि लहान मुलांसाठी काम करायच्या. त्यांचं समुपदेशन करायच्या. त्यांनी या कार्यात आपल्याला झोकून दिलं होतं. त्या आर्मी वाईव्हस वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. मधुलिका यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मधुलिका यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांनी सैनिकांच्या अनेक कुटुंबांना आधार दिला. सैनिकांच्या पत्नींचा मनातला उत्साह वाढवला. त्यांना प्रोत्साहन दिलं.

मधुलिका रावत यांचं मोठं समाजकार्य

मधुलिका या दिवंगत राजकारणी मृगेंद्र सिंह यांच्या कन्या होत्या. त्या मध्य प्रदेशातील शहडोल येथील मूळ रहिवासी होत्या. मधुलिका यांनी AWWA या संस्थेमार्फत लष्करातील जवानांच्या पत्नी, मुले आणि आश्रित यांच्यासाठी प्रचंड काम केलं. त्यांनी शहीद जवानांच्या पत्नींसाठी तसेच दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांनी शेकडो सैनिकांच्या पत्नींना स्वालंबनाचे धडे दिले. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी त्यांनी महिलांना ब्युटीशियन कोर्सेससह टेलरिंग, विणकाम आणि बॅग मेकिंगचे शिक्षण घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी तशा कोर्सेसच्या कार्याक्रमांचं आयोजनही केलं. तसेच त्यांनी अनेक लष्करी जवानांच्या कुटुंबातील महिलांना 'केक्स आणि चॉकलेट्स' बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं.

हेही वाचा : तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचं निधन

बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली

देशसेवेसाठी स्वत:ला वाहून दिलेल्या शूर बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव कृतिका रावत आहे. त्यांची लहान मुलीचं शिक्षण सुरु आहे. या दोन्ही मुलींना आपल्या आई-वडिलांचा अभिमान होता. इतके समृद्ध कर्तृत्वावन आई-वडिलांचं एकाचवेळी निधन होणं ही प्रचंड दुर्देवी बाब आहे. परमेश्वर या दोन्ही मुलींना आणि रावत यांच्या इतर कुटुंबियांना या दु:खाला सामोरं जाण्यासाठी बळ देवो, अशी प्रार्थना आता देशभरातून केली जातेय.

बिपीन रावत आणि लष्कराचं नातं आणि कार्य याविषयी थोडक्यात माहिती

बिपिन रावत यांचे वडील एल एस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जात होते. बिपिन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

हेही वाचा : तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 14 जणांपैकी केवळ कॅप्टन वरुण सिंग बचावले, 13 जणांचं दुर्देवी निधन

बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गुरखा 11 रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आय एम ए देहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होते. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे. रावत यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.

First published: