समर्थकांसाठी गाडीची काच केली खाली, मात्र ज्योतिरादित्य शिंदेंना मिळाली 'बेशरमेची फुलं'

समर्थकांसाठी गाडीची काच केली खाली, मात्र ज्योतिरादित्य शिंदेंना मिळाली 'बेशरमेची फुलं'

संतप्त शिंदेंनी गाडीची काच खाली केली व निघून गेले.

  • Share this:

ग्वाल्हेर, 12 जून : भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना ग्वाल्हेरमध्ये विरोधाचा सामना करावा लागला. एनएसयूआयने ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदेचा ताफा थांबवला. आणि ज्योतिरादित्यांना (Jyotiraditya Scindia angry) बेशर्माची फुलं आणि धिक्कार पत्र सोपवलं. शिंदे यांनी सुरुवातील आपलं कार्यकर्ता समजून गाडी थांबवली होती, मात्र हातात पत्र घेताना ते चिडले होते आणि फूलं परत करुन पुढे निघून गेले.

राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सध्या तीन दिवसांच्या अंचल दौऱ्यावर होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोणत्याही नेत्याचाही अंचलमध्ये पहिलाच दौरा होता. संपूर्ण कोरोना काळात बेपत्ता असलेल्या ज्योतिरादित्यांचा येथे पहिल्यापासूनच विरोध होत होता. मात्र त्यांच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था कडक होती. पोलीस कोणालाही त्यांच्या जवळ जाऊ देत नव्हती. शुक्रवारी एएसयूआयचा नेता वंश माहेश्वरी याला पोलिसांनी नजरबंद केलं होतं.

हे ही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे, 'या' नावांची जोरदार चर्चा

एएसयूआयचे प्रमुख नेते सचिन द्विवेदी यांचा तपास सुरू होता. तीन दिवस विरोधापासून बचाव करीत शिंदे ग्वाल्हेरमध्ये राहिले. मात्र शहरातून बाहेर जाण्यापूर्वी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. शनिवारी सकाळी 10.30 वाजता शिंदे आपल्या कारमधून रस्तेमार्गाने दिल्लीला रवाना होत होते. त्यावेळी गोलाच्या मंदिराजवळ NSUI चे कार्यकर्ता नेता सचिन कुमारच्या नेतृत्वात एकत्र झाले होते. गोला मंदिराच्या चौकात शिंदेंची कार पोहोचताच एनएसयूआयच्या लोकांना त्यांना घेरलं. शिंदेंना वाटलं की हे त्यांचे समर्थक आहेत. त्यानंतर शिंदेंनी गाडीची काच खाली घेतली. त्याचवेळी जमा झालेल्यानी घोषणाबाजी सुरू केली. NSUI नेता सचिन यांनी शिंदेना बेशरमेची फुलं आणि धिक्कार पत्र सोपवलं. धिक्कार पत्र वाचून शिंदे चिडले आणि काच वर करून निघून गेले.

Published by: Meenal Gangurde
First published: June 12, 2021, 8:33 PM IST

ताज्या बातम्या