जाहिरात
मराठी बातम्या / देश / लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, 'या' नावांची जोरदार चर्चा

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, 'या' नावांची जोरदार चर्चा

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, 'या' नावांची जोरदार चर्चा

Reshuffle in Union Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच (Reshuffle in Union cabinet)फेरबदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच (Reshuffle in Union cabinet)फेरबदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah ) आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president J P Nadda )यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधान आलं. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास दुसऱ्या काळातील मोदी सरकारचा हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असेल. फेरबदलासाठी एकूण 23 खाते निवडण्यात आल्याचं समजतंय. या खात्याच्या मंत्र्यांच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकशी केली. पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त पदाचा भार

  • रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, रेल्वे मंत्रालयाव्यतिरिक्त उपभोक्ता मंत्रालयाचा कारभार आहे.
  • माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे.
  • कृषी, पंचायती राज, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे अन्न प्रक्रियेचा अतिरिक्त कार्यभार आहे.
  • आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे आहे.

आता केंद्रीय मंत्रिमंडळात 59 मंत्री गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे कॅबिनेटच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 21 कॅबिनेट आणि 9 स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि 29 राज्यमंत्री आहेत. हेही वाचा-  मोठी बातमी:  मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळली फेरबदलात याच्या नावाची चर्चा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्यांचही सूत्रांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात