जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली

T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली

T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) सध्या एकही गोष्ट चांगली घडत नाहीय. धी न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंड या दोन टीमनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला. या सर्वांमधून सावरण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेटला गेल्या 24 तासांमध्ये आणखी दोन धक्के बसले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर : पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) सध्या एकही गोष्ट चांगली घडत नाहीय. टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीमवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरू आहे.  या टीमची निवड जाहीर होताच काही तासांमध्ये पाकिस्तान टीमचा हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आधी न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंड या दोन टीमनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला. या सर्वांमधून सावरण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेटला गेल्या 24 तासांमध्ये आणखी दोन धक्के बसले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान (Wasim Khan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  खान यांची माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी 2019 साली नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 पर्यंत होता. न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा आयोजित करण्यामागे त्यांची मुख्य भूमिका होती. रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद काही दिवसांपूर्वी स्विकारले आहे. त्यानंतर त्यांना  मुदतवाढ मिळणार नाही, हे नक्की होते. T20 World Cup : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पंतप्रधान नाराज, लवकरच टीममध्ये बदल होणार! प्रमुख खेळाडूला डेंग्यूची लागण पाकिस्तान टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यानं सध्या सुरू असलेल्या नॅशनल टी20 क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसंच पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमधील त्याचा सहभाग देखील अनिश्चित आहे. हाफीजनं टी20 क्रिकेटमध्ये 7 हजारपेक्षा जास्त रन काढले आहेत. तसंच त्यानं भारताविरुद्ध शतकही झळकावले आहे. World Heart Day च्या दिवशी पाकिस्तानात गडबड, इंझमाम म्हणतो ‘मला हार्ट अटॅक आलाच नाही!’ हाफिजला झालेले संक्रमण किती गंभीर आहे, यावर त्याचे आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळणे अवलंबून असेल. सामान्यपणे डेंग्यूतून पूर्ण बरा होण्यासाठी पेशंटला एक महिन्याचा कालावधी लागतो, अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे. पाकिस्तानची टीम 14 ऑक्टोबरच्या आसपास वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यूएईला रवाना होईल. पाकिस्तानची पहिली मॅच 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात