मुंबई 26 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व देश एक प्रकारे घरातच बदिस्त झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखायला असेल तर लॉकडाउन हा सर्वात मोठा उपाय आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. सध्यातरी त्याच्याशिवाय मार्ग नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. कोरोना हा एका माणसातून दुसऱ्यामध्ये संक्रमीत होते. त्यामुळे त्याची साखळी तोडणं आवश्यक असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सूचनेनुसार तीन आठवड्यांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. आजचा लॉकडाउनचा दुसरा दिवस आहे. पण कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने हातावर पोट असणाऱ्या गरीबांसाठी मोठी घोषणा केली. धान्य आणि थेट त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा होणार आहेत. हे पुढचे तीन महिने राहणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये जवळपास दोन महिने लॉकडाउन होतं, इटलीमध्येही सध्या लॉकडाउन आहे. केवळ लॉकडाउनमुळे हा प्रश्न सुटणार नाही तर अशा रुग्णांना हुडकून काढून त्यांच्यावर उपचार करणं आणि बाधितांना कॉरंटाईन करणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
नांदेडमध्ये गुरुव्दारा दर्शनासाठी आलेले 3 हजार भाविक अडकले
कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.
‘आता फक्त ‘हे’ 3 पर्याय आहेत’, अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव
लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

)







