नवी दिल्ली, 21 एप्रिल : देशभरात कोविड-19 (Covid -19) चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात सरकार कोरोनावर (Coronavirus) नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करीत आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
अधिकारी घेणार निर्णय
दिशानिर्देशातील पहिल्या मुद्द्यानुसार कोरोना संसर्ग वा संशयित रुग्णांचा मृतदेह भारतात आणणे योग्य नाही, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र अशा परिस्थितीत जर मृतदेह भारतीय एअरपोर्टवर पोहोचला तर संबंधित एअरपोर्टचे आरोग्य अधिकारी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार तातडीने पावले उचलतील.
मृत्यू प्रमाणपत्राचा तपास
संबंधित आरोग्य अधिकारी मृत्यू प्रमाणपत्राचा तपास करतील. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळेल. मृतदेह घेऊन जाण्यासाठी भारतीय दूतावासद्वारे दिलेल्या एनओसीचा तपास करण्यात येईल आणि अधिकृत एजंसीद्वारे दिलेल्या प्रमाणपत्राचा तपास करण्यात येईल.
मृतदेह हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला सर्व गाइडलाइन्सचे पालन करणे बंधनकारक असेल. त्या अधिकाऱ्यांना पुढील 28 दिवस मॉनिटर केले जाईल आणि ज्या वाहनात मृतदेह आणण्यात आलं आहे त्यावर औषधांची फवारणी केली जाईल. अंतिम संस्कारानंतर अस्थी आणल्या तर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोणतीही भीती नसेल. मात्र उड्डाणादरम्यान जर कोणा व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना कोविड – 19 संशयित श्रेणीत ठेवण्यात येईल आणि याची माहिती एअरपोर्ट आरोग्य अधिकाऱ्यांनी देण्यात येईल.
संबंधित-कोरोना योद्धा! रुग्णांसाठी टॅक्सी चालकाने लावली जीवाची बाजी, केली अशी मदत
प्रेरणादायी! लॉकडाऊनमध्ये कामाचा सदुपयोग, 'हा' वल्ली तयार करतोय कोरोना लायब्ररी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.