मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागणार का? प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागणार का? प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

Pravin Darekar on Nawab Malik: महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. प्रवीण दरेकरांनी नवाब मलिक यांना थेट सवाल केला आहे.

Pravin Darekar on Nawab Malik: महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. प्रवीण दरेकरांनी नवाब मलिक यांना थेट सवाल केला आहे.

Pravin Darekar on Nawab Malik: महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. प्रवीण दरेकरांनी नवाब मलिक यांना थेट सवाल केला आहे.

मुंबई, 2 मे: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल (West Bengal Assembly Election result) जाहीर झाले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच पहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्योरोपाच्या फैरी झाडू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा (Amit Shah) यांनी राजीनामा देण्याचं वक्तव्य केल्यावर आता प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिकांना यशाची व्याख्याच माहिती नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहा यांनी तेथील अपयशासाठी राजीनामा देण्याची मागणी केली. मला वाटतं त्यांना यशाची व्याख्याच माहिती नाही. 3 वरुन आज 80 जागांवर पोहोचलो आहे. मग मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? देशातील पाच राज्यांत निवडणुका असताना आसाम, पुदुच्चेरीत भाजपचा विजय झाला आहे. बेळगाव, पंढरपुरात भाजपचा विजय झाला आहे. देशभरात भाजपला जनाधार असल्याचं चित्र आहे तरीही देशातील एका राज्यात सत्ता आली नाही म्हणून राजीनामा मागणाऱ्या नवाब मलिक यांना मला सांगायचं आहे की, पंढरपूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सरकारने एकत्रित ताकदीने लढून सुद्धा पराभूत झाले आहेत मग तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असा प्रश्न नवाब मलिक यांना मला विचारायचा आहे. West Bengal निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात! आव्हाडांच्या ट्विटनंतर नव्या राजकीय चर्चांचा उधाण काय म्हणाले होते नवाब मलिक? पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं वातावरण गेल्या 2-3 वर्षांत निर्माण केलं गेलं आहे. या देशाचे गृहमंत्री केवळ आकडे फेकत आहेत. अबकी 200 के पार. किती खोटं बोलावं. नेहमी आकडे फेकून एकही मटका त्यांचा लागत नाही. लोकांनी भाजपला बंगालमध्ये नाकारलं आहे. जी परिस्थिती देशात कोविडमुळे निर्माण झाली आहे. त्याची जबाबदारी स्वीकारुन, जेव्हा ममता दीदींनी सांगितलं की अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे. तेव्हा अमित शहा सांगत होते जनतेने सांगितलं तर मी राजीनामा देईन. आता निकाल लागलेला आहे. बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. तात्काळ अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Assembly Election 2021, Nawab malik, Pravin darekar

पुढील बातम्या