मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बुलडाणा: हयात नसलेल्या महिलेला मिळाली लस; शतकोटी लसीकरणाचा आणखी एक सावळागोंधळ

बुलडाणा: हयात नसलेल्या महिलेला मिळाली लस; शतकोटी लसीकरणाचा आणखी एक सावळागोंधळ

बुलडाण्यातील एका मृत महिलेला कोरोना लस (dead woman get corona vaccine) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

बुलडाणा, 03 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसात देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) नियंत्रणात आला आहे. पण भविष्यातील संभाव्य कोरोना विषाणूच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन देशात व्यापक प्रमाणात लसीकरण (Corona vaccination in india) मोहीम राबवली जात आहे. अलीकडेच देशात 100 कोटी लशी (100 Crore doses in india) दिल्याने मोदी सरकारने मोठा उत्सव साजरा केला होता. असं असताना बुलडाण्यातील एका मृत महिलेला लस (dead woman get corona vaccine) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. असं असताना त्यांनी तामिळनाडूमध्ये लस घेतल्याचा मेसेज आला आहे.

यासोबत लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र देखील पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्तीला लस दिल्याची ही पहिलीच घटना नाही. तर अशाप्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी येथील एका मृत व्यक्तीला लस दिल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता. बन्सिलाल सुका धनराळे (वय-66) असं संबंधित व्यक्तीचं नाव असून त्याच्या निधनानंतर सहा महिन्यांनी 19 ऑक्टोबर 2021 रोजी बन्सिलाल यांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला होता.

हेही वाचा-देशातल्या Corona लसीकरणासंदर्भातली मोठी अपडेट, जनतेसाठी नवी मोहिम सुरु

यानंतर आता, सखूबाई गोपाळ बरडे या महिलेला लस दिल्याचा मेसेज आला आहे. 75 मृत सखूबाई बुलडाणा शहरातील आढाव गल्लीत पती गोपाळराव आणि मुलगा राजेश यांच्यासमवेत राहत होत्या. 17 एप्रिल रोजी त्याचं निधन झालं होतं. सखूबाई यांचा मृत्यू होऊन सात महिने झाल्यानंतर 2 नोव्हेबर रोजी गोपाळराव यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. यामध्ये सखूबाई यांनी कोरोना लसीचा डोस घेतल्याचं नमूद करण्यात आलं होतं. संबंधित मेसेजमधील लिंकवर क्लिक केलं असता, लसीकरणाचं प्रमाणपत्र देखील मिळालं आहे.

हेही वाचा- सब गोलमाल है! धुळ्यात हयात नसलेल्या व्यक्तीला मिळाली लस, लसीकरणाचं प्रमाणपत्रही पाठवलं

तमिळ आणि इंग्रजी भाषेत असणाऱ्या प्रमाणपत्रात तमिळनाडू राज्यातील येन्नमंगलम् पीएचसी, यरोडे येथे लस देण्यात आल्याचं नमूद आहे. विशेष म्हणजे सखूबाई किंवा त्यांचं कुटुंह कधीही तामिळनाडूला गेले नाहीत. असं असताना सखूबाई यांचं आधार नंबर तिकडे कसा गेला आणि महाराष्ट्रात मोबाइलवर मेसेज कसा आला? असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. संबंधित नेमका प्रकार काय आहे, याची चौकशी व्हावी. असं मत राजेश बरडे यांनी व्यक्त केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Corona vaccination