Home /News /national /

Agnipath Protest अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ 'या' राज्यात बंदची हाक, इंटरनेट बंद, परिस्थिती हाताबाहेर

Agnipath Protest अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ 'या' राज्यात बंदची हाक, इंटरनेट बंद, परिस्थिती हाताबाहेर

सैन्य भरतीसाठी (army Recruitment central government) केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ (agnipath protest) बिहारमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.

  पाटणा, 18 जून : सैन्य भरतीसाठी (army Recruitment central government) केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ (agnipath protest) गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे बिहारमध्ये (bihar) वातावरण तंग आहे. दरम्यान विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी रेल्वेला लक्ष केल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. (protest against agnipath scheme) त्याचबरोबर काही आंदोलनामुळे सामान्य जनजीवनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे दुकानांपासून रेल्वे ट्रॅकपर्यंत खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली.

  राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी तसेच विविध विद्यार्थी संघटनांसह अनेक विरोधी पक्षांनी बिहार बंदची हाक दिली आहे. शनिवारी पुकारण्यात आलेल्या या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयाने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. मात्र बिहार बंद दरम्यान परिस्थिती बिघडल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे.

  हे ही वाचा : सिद्धू मुसेवालाला खरंच संतोष जाधवने मारली गोळी? 5 दिवसांच्या चौकशीत नवा खुलासा, प्रकरणाला वेगळंच वळण

  यादरम्यान बिहारमध्ये सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजपासून बिहार बंद पुकारण्यात आल्याने वातावरण तणावाचे असले तरी कुठेही जाळपोळीच्या घटना होताना दिसल्या नाहीत. दरम्यान बिहार पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस प्रमुख संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयाने पाटणासह इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.

  एडीजी संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ज्या भागात तणावाचे वातावरण आहे त्या भागात तीन निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या एकूण 10 तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. तैनात केलेल्या निमलष्करी दलांमध्ये आरएएफची एक तुकडी, सीआरपीएफच्या तीन कंपन्या आणि एसएसबीच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे.

  हे ही वाचा : Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, चेक करा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

  याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पाटणासह विविध जिल्ह्यांमध्ये बिहार पोलिसांच्या विशेष सशस्त्र दल बीएसएपीचे बटालियनही तयार करण्यात आले आहेत. यासोबतच सर्व जिल्हा पोलिसांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

  शुक्रवारी परिस्थिती अनियंत्रित झाली होती

  विशेष म्हणजे शुक्रवारी पहाटे पाच वाजता सुरू झालेले आंदोलन दिवसभर सुरूच होते. दानापूरपासून समस्तीपूरपर्यंत दंगल सुरूच होती. हल्लेखोरांनी अनेक दुकानांसह खासगी वाहने आणि गाड्यांना लक्ष्य केले. ही परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी बिहार पोलीस आणि रेल्वे पोलिसांना सुमारे बारा तास लागले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bihar, Protest, Protest March

  पुढील बातम्या