मुंबई, 18 जून : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) अचानक घसरण झाली आहे. शनिवारी सकाळी ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 113 डॉलरवर व्यापार करत आहे. क्रूड एका दिवसात उच्चांकावरून 5 टक्क्यांहून अधिक घसरला. कच्च्या तेलात आणखी नरम पडल्यास देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतीही वाढ झालेली नाही. अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका
राज्यातील प्रमुख शहरांमधील दर
>> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
>> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर
>> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर
>> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर
>> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीट
>> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीट
>> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर
>> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर
दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
Aadhar Instant Loan: पैशांचे अडचण असेल तर आधार कार्ड करेल मदत; तातडीने लोन घ्या
SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.