पटना 23 मार्च : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह (Uttarakhand CM Tirath Singh Rawat) यांचं फाटलेल्या जिन्सबाबतचं विधान मागील काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. अशात आता यात पुन्हा भर पडली आहे मध्य प्रदेशच्या पर्यटन व संस्कृती मंत्र्यांच्या विधानाची. पर्यटन व संस्कृती मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur on Ripped Jeans) यांनी म्हटलं, की फाटलेले कपडे घालणं आधीपासून अपवित्र मानलं जातं. सोबत संस्कृतीचं पालन करणाऱ्या कुटुंबांमध्ये असे कपडे घातले जात नाहीत.
मंत्री उषा ठाकूर सोमवारी भोपाळ दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमासाठी आलेल्या असताना तीरथ सिंह यांच्या फाटलेल्या जिन्सबद्दलच्या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली गेली. यावर आजतकला दिलेल्या प्रतिक्रियेत ठाकूर म्हणाल्या, की माझं स्वतःच मत तर असं आहे, की भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपली आजी आपले कपडे थोडेही फाटले तरी आपल्याला ते घालू नको असं सांगायची. भारतीय संस्कृतीमध्ये फाटलेले कपडे अपवित्र मानले जातात. त्यामुळे, आपल्याकडे जे संस्कृतीचं पालन करणारे लोक आहेत किंवा परंपरेनुसार जीवनशैली जगत आलेले लोक आहेत ते अशा प्रकराचे कपडे घालत नाहीत.
काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी रिप्ड जिन्सवर सवाल उपस्थित करत हे संस्कृतीच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी एक उदाहरणदेखील दिलं होतं. त्यांचं हे विधान पाहाता पाहाता चर्चेचा विषय ठरलं आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. तीरश सिंह रावत यांच्या या विधानानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपले फाटक्या जिन्समधील फोटोही पोस्ट केले. सोबतच #rippedjeans हा हॅश्टॅगदेखील सोशल मीडियावर ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशात आता उषा ठाकूर यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Tirath singh rawat, Uttarakhand